महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जळगाव तापले, पारा ४३ अंशावर - hnS

आठवडाभरापूर्वी ३६ ते ३८ अंशांवर असलेले तापमान आता ४ ते ५ अंशांनी वाढून ४३ अंशांपर्यंत गेले आहे.

जळगांव तापमान ११

By

Published : Apr 1, 2019, 11:55 AM IST

जळगाव- गेल्या आठवडाभरापासून जळगावाच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे.तापमानाचा पारा ४२ ते ४३ अंश सेल्सियसवर गेला आहे. आठवडाभरापूर्वी ३६ ते ३८ अंशांवर असलेले तापमान आता ४ ते ५ अंशांनी वाढून ४३ अंशांपर्यंत गेले आहे.

जळगांवच्या तापमानाबाबत नागरिकांच्या प्रतिक्रिया

सकाळी १० वाजल्यानंतर उन्हाचा कडाका वाढत असून दुपारी घराबाहेर पडणे मुश्किलहोत आहे. दुपारी १ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत तापमानाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. मार्चमध्येच तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी पार केल्याने पुढे एप्रिल आणि मेमहिन्यात काय परिस्थिती असेल, ही चिंता जळगावकरांना पडली आहे.

वाढत्या उन्हामुळे जळगावकरांना आपली दैनंदिन कामे सकाळीच आटोपून घ्यावी लागत आहेत. अगदी अपवादात्मक परिस्थितीतच नागरिक घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे.शाळकरी विद्यार्थी, नोकरदार तसेच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना उन्हाच्या कडाक्याचा त्रास सहन करावा लागतोय. उन्हापासून बचाव व्हावा म्हणून प्रत्येकजण डोक्याला पांढरा रुमाल, डोळ्यांचे रक्षण व्हावे म्हणून सनगॉगल घालूनच घराबाहेर पडत आहे. युवती व महिला देखील अंगात सनकोट, डोक्याला स्कार्फ बांधून उन्हापासून बचाव करत आहेत.

दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रताअधिक जाणवत आहे. त्यामुळे लस्सी,ताक, मठठा, लिंबू सरबत, उसाचा रस अशा शीतपेयांची मागणी वाढली आहे. शीतपेयांच्या दुकानांवर ग्राहकांची गर्दी दिसून येत आहे. कलिंगड, खरबूज यांसारख्या फळांना मागणी वाढली आहे. एकंदरीत तापलेलेराजकीय वातावरण आणि वातावरणातील उकाडा या दोन्ही बाबींचा अनुभव जळगावकरांना येतोय.

ABOUT THE AUTHOR

...view details