जळगाव - शहर व जिल्ह्यात धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धुळवडनिमित्त तरुणांमध्ये अपूर्व उत्साह होता. शहरात सार्वजनिक मंडळे, सेवाभावी संस्थांतर्फे मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
जळगावात उत्साहाने धुळवड साजरी
शहरातील काही सार्वजनिक मंडळातर्फे संगीत व्यवस्था करून एकत्रितपणे धुळवड साजरी केली गेली. धुळवडीदिवशी अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनातर्फे शहरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जळगाव - धुळवड साजरी करताना तरुणाई
दरवर्षी होळीच्या दुसऱ्या दिवशी येणारा धुळवडचा सण जळगावात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी देखील सकाळपासून धुळवड खेळायला सुरुवात झाली. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सर्वच जण एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करत होते. यावेळी पर्यावरणपूरक रंगांचा वापर करण्यावर भर दिला गेला. यावर्षी सर्वत्र दुष्काळाचे सावट असल्याने पाण्याचा कमीतकमी वापर केला जात असल्याचे सकारात्मक चित्र आहे.