महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Varun Sardesai Criticism on BJP : भाजप राज्यातील मंत्र्यांवर कारवाई करुन त्यांना बदनाम करत आहे - वरुण सरदेसाई - मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे

रशिया आणि युक्रेन युद्धात आपले पंतप्रधान विश्वगुरु झाल्याचा भास निर्माण केला. पाच राज्यात निवडणूक लढवल्या आणि चार राज्यात जिंकले. मात्र, आता रोजच इंधनाचे दर वाढत आहेत, कधी ही न पाहिलेली महागाई आज पाहायला मिळत आहे. त्यामुळे बेरोगारी वाढत आहेत. त्याविरोधात आवाज उठवल्याने महाविकास आघाडी नेत्यांच्या विरोधात चौकशी लावून बदनामी करत आहेत, अशी टीका युवासेना नेते वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ) यांनी केली.

म

By

Published : Mar 30, 2022, 8:34 PM IST

औरंगाबाद- देश भरातील स्थिती सर्वांना माहित आहे. देशाने दोन वेळा एक हाती सत्ता दिली त्यावेळी त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण होतील, असा विश्वास होता. युवकांना रोजगार मिळेल, असे वाटत होते. मात्र, जिथे सत्ता नाही तिथे सत्ता कशी मिळवता येईल यासाठी ते प्रयत्न करू लागले, अशी टीका युवासेना नेते वरुण सरदेसाई ( Varun Sardesai ) यांनी केली. ते मंगळवारी ( दि. 29 मार्च ) औरंगाबादच्या दौऱ्यावर होते.

बोलताना वरुण सरदेसाई

राऊत आमचे नेते, त्यांच्या मनात काय आहे माहित नाही- संजय राऊत ( Sanjay Raut ) रोज पत्रकार परिषद घेऊन नवनवीन खुलासे करत असतात. त्यांनी कभीकभी खामोश रहेना अच्छा होता है, असे ट्विट केले त्यावर बोलताना वरुण सरदेसाई यांनी सावध भूमिका घेतली. संजय राऊत आमचे नेते आहेत. त्यांच्या मनात काय आहे हे आम्ही सांगू शकत नाही, असे वरुण सरदेसाई यांनी सांगितले.

भाजप नेत्यांना बदनाम करत आहे -रशिया आणि युक्रेन युद्धात आपले पंतप्रधान विश्वगुरु झाल्याचा भास निर्माण केला. पाच राज्यात निवडणूक लढवल्या आणि चार राज्यात जिंकले. मात्र, आता रोजच इंधनाचे दर वाढत आहेत, कधी ही न पाहिलेली महागाई आज पाहायला मिळत आहे. त्यामुळे बेरोगारी वाढत आहेत. त्याविरोधात आवाज उठवल्याने महाविकास आघाडी नेत्यांच्या विरोधात चौकशी लावून बदनामी करत आहेत. बादनामी करुन प्रतिमा खराब करु शकतो, असे वाटत असेल तर आमच्या सोबत फिरा तुम्हाला कळेल युवक उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत. कोणीही टिका करु द्या चांगले मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांचे नाव सर्व्हेमध्ये आघाडीवर आहे. आदित्य ठाकरे यांच्या कामाची शैली पाहून त्यांच्या टीमचा सदस्य होऊ पाहत आहे. युवासेनेच्या सदस्य नोंदणीत 15 लाख युवक जोडायचे आहेत, असे सरदेसाई यांनी मेळाव्यात सांगितले.

हेही वाचा -Nana Patole Reply Sujay Vikhe : काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार; नाना पटोलेंचा सुजय विखेंवर पलटवार

ABOUT THE AUTHOR

...view details