औरंगाबाद -सामाजिक संदेश देणारी घोषवाक्य आणि कार्यक्रम अनेकांना कंटाळवाणे वाटतात. अशा स्थितीत शहरातील एक तरुण चार्लीच्या विविध कलांच्या साह्याने नागरिकांना हसवत मतदान करण्याचे आवाहन करतो. नागरिकांकडून त्याच्या अनोख्या मतदान जागृतीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
चार्ली चॅप्लीनचा मूक अभिनय करून 'तो' देतो मतदान जनजागृतीचा संदेश - सोमनाथ स्वभावाने
औरंगाबादमधील प्रचार सभा असोत की सार्वजनिक ठिकाण हा चार्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे

औरंगाबादमधील प्रचार सभा असोत की सार्वजनिक ठिकाण हा चार्ली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हा व्यक्ती कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही. तर औरंगाबादसह राज्यात अनेकांना परिचित असलेला ज्यनुअर चार्ली म्हणजेच सोमनाथ स्वभावाने हा आहे. मतदान करा, मतदानाच्या दिवशी गावाला जाऊन नका. झोपून राहू नका, योग्य उमेदवार द्या, अशी तो जगनजागृती करत आहे. नागरिक चार्लीसोबत स्लेफी काढून मतदान करणार असल्याचे आश्वासन देत आहेत.
मतदाना जागृतीचा प्रभावी संदेश-
चार्ली चॅप्लिनच्या वेशात सोमनाथ हा शहरात असणाऱ्या सर्वच पक्षांच्या जाहीर सभांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी मतदान जागृती करताना दिसत आहे. कधी आपल्या अनोख्या सायकलवर स्वार होऊन तर कधी नागरिकांसोबत नृत्य करतो. तो मतदान करा असे आपल्या मूक अभिनयातून सर्वांना सांगत आहे. ज्युनियर चार्ली म्हणजेच सोमनाथ स्वभावानेवर चार्लीच्या जीवनाचा खूप प्रभाव आहे. त्याच्या जीवनातील अनेक गोष्टींमुळे सोमनाथ प्रभावित आहे. त्यामुळे त्याच्यासारखे जगायचे आणि हसवत राहायचे हा त्याचा छंद आहे. चार्लीच्या वेशात आल्यावर सोमनाथ पूर्णतः त्याच्यासारखा वागू लागतो. जोपर्यंत चार्लीच्या भूमिकेत आहे, तोपर्यंत तो कोणासोबतही बोलत नाही. गेल्या पंधरा वर्षांपासून चार्लीच्या भूमिकेत तो मतदानासाठी जनजागृती करत आहे. त्याच्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.