महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Agneepath Yojana in Aurangabad औरंगाबादमध्ये अग्निपथ योजनेत सैन्य भरतीसाठी आलेल्या युवकांचे हाल - students face trouble due to rain

अग्निपथ योजनेअंतर्गत मराठवाडा विभागीय भरती सुरू करण्यात आली आहे Agneepath Yojana in aurangabad . मात्र या भरतीच्या ठिकाणी रात्री झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना आतोनात हाल सहन करावे लागत आहेत Youth facing Difficulties in recruitment . परिसरात तयार झालेला चिखल आणि राहण्यासाठी नसलेली व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना रात्र काढणे अवघड झाले होते.

army recruitment
सैन्य भरतीत युवकांचे हाल

By

Published : Aug 17, 2022, 9:49 AM IST

औरंगाबाद अग्निपथ योजनेअंतर्गत मराठवाडा विभागीय भरती सुरू करण्यात आली आहे Agneepath Yojana in aurangabad . मात्र या भरतीच्या ठिकाणी रात्री झालेल्या पावसामुळे विद्यार्थ्यांना आतोनात हाल सहन करावे लागत आहेत Youth facing Difficulties in recruitment . परिसरात तयार झालेला चिखल आणि राहण्यासाठी नसलेली व्यवस्था यामुळे विद्यार्थ्यांना रात्र काढणे अवघड झाले होते.

अग्निपथ योजनेचा पहिला टप्पा सुरू केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्नीपथ या योजनेचा Agneepath Yojana पहिला टप्पा सुरू झाला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांसह आसपासच्या जिल्ह्यातील युवकांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात ही भरती सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सकाळीच सुरू होणारी चाचणी त्यासाठी रात्रीच अनेक उमेदवार विद्यापीठ परिसरात दाखल होत आहेत. रात्री झालेल्या पावसामुळे परिसरात थांबण्यासाठी जागा या विद्यार्थ्यांना सापडली नाही. तर रस्त्यावर साठलेल्या चिखलामुळे अनेक उमेदवारांना मैदानापर्यंत येण्यास अडचणीचा सामना करावा लागला. मध्यरात्री दाखल झालेल्या उमेदवारांना विद्यापीठ परिसरात राहण्यासाठी कुठलीही सोय ही नव्हती. त्यामुळे अनेकांनी रात्र पावसात भिजत काढली. अग्निपथ योजनेत भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना रात्री अतोनात हाल झाल्याचं समोर आलं. मंगळवारी रात्री जालना जिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्याला झालेल्या त्रासाबद्दल माहिती सांगितली.

हेही वाचाGondia Accident गोंदियात भगत की कोठी ट्रेनला अपघात 50 हून अधिक जखमी

ABOUT THE AUTHOR

...view details