महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

लस चाचणीत तरुणाचा मृत्यू; न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार - aurangabad vaccine news

कंपनीने एका आजारावरील संशोधनासाठी (कोरोना नव्हे) लस तयार केली होती. ती त्याला मंगळवारी (२मार्च) रोजी देण्यात आली. त्यानंतर अचानक त्याचा रक्तदाब कमी झाला. प्रचंड तापही आला. त्यामुळे कंपनीतील कामगारांनी त्याला जालना रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

fsd
लस चाचणीत तरुणाचा मृत्यू;

By

Published : Mar 8, 2021, 9:50 AM IST

Updated : Mar 8, 2021, 10:25 AM IST

औरंगाबाद -शहरातील वोक्हार्ट कंपनीत काम करणाऱ्या १९ वर्षीय कामगाराचा शनिवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कंपनीने संशोधनासाठी तयार केलेली लस त्याने घेतली होती. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नाही तोबर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. रोहित विजय नरवडे (रा. जाधववाडी) असे त्या मृत तरुणाचे नाव आहे.

लस चाचणीत तरुणाचा मृत्यू;

२ मार्चला घेतली होती लस -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित वोक्हार्ट कंपनीच्या संशोधन विकास विभागात कामला होता. कंपनीने एका आजारावरील संशोधनासाठी (कोरोना नव्हे) लस तयार केली होती. ती त्याला मंगळवारी (२मार्च) रोजी देण्यात आली. त्यानंतर अचानक त्याचा रक्तदाब कमी झाला. प्रचंड तापही आला. त्यामुळे कंपनीतील कामगारांनी त्याला जालना रोडवरील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्याची प्रकृती गंभीर असल्याने रुग्णालय प्रशासनाने एमएलसीची नोंद केली होती. त्यानुसार एमआयडीसी सिडको पोलीस शनिवारी दुपारी जबाब घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. पण तो बोलण्याच्या स्थितीत नव्हता. त्याच्यासोबत नातेवाईकही नसल्याने पोलिसांना जबाब नोंदवता आला नाही.

या सर्व घडामोडीनंतर शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास रोहितचा मृत्यू झाला. मात्र, नेमक्या कोणत्या कारणाने रोहितचा मृत्यू झाला, हे स्पष्ट झाले नाही. त्यामुळे सध्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संशोधनासाठी गरिबांच्या मुलांचा जीव घेणार का?

शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात आणण्यात आला होता. यावेळी मृताच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात गर्दी केली होती. या कंपनीने त्याला लस देताना कोणाची परवानगी घेतली होती. यांच्या संशोधनासाठी गरिबांच्या मुलांचा जीव घेणार का? असा मृत मुलाच्या आईने केला. तसेच जो पर्यंत कंपनीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्याच्या नातेवाईकांनी घेतली.

Last Updated : Mar 8, 2021, 10:25 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details