औरंगाबाद - वडिलांच्या रंगकामच्या साईट वर कामगारांना नाश्ता देण्यासाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुण मोबाईलवर बोलत असताना इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून तोल गेल्याने खाली पडून मृत्यू ( man dies falling sixth floor in aurangabad ) झाला. ही घटना ऑगस्ट होम उल्कानगरी येथे सोमवारी रात्री घडली.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार -
विशाल छोटेलाल सहानी वय 19 रा. देवानागरी असे मयत तरुणाचे नाव आहे. छोटेलाला सहानी हे रंगकाम ठेकेदार आहे. त्यांना तीन मुले आहेत. विशाल हा एमआयटी कॉलेज मध्ये आर्किटे्चरच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता. छोटेलाल यांच उलकानगरी येथील अगस्त होम येथे इमारतीचे रंगकाम सुरू आहे. सोमवार दि. १७ रोजी संध्याकाळी त्याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना नाष्टा देण्यासाठी गेला होता. विशालने कामगारांना नाष्टा दिल्यानंतर सहाव्या मजल्यावर फोनवर बोलत होता. यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खाली कोसळला. यावेळी परिसरात आवाज झाल्याने नागरिकांनी धाव घेतली. यावेळी विशाल हा खाली पडलेला होता. दरम्यान त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी जवाहर नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष राऊत करीत आहे.
हेही वाचा -धक्कादायक : बळीच्या कार्यक्रमात दारुच्या नशेत बकऱ्याऐवजी कापला व्यक्तीचाच गळा