औरंगाबाद - दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच असलेले किलिमांजारो या शिखरावर औरंगाबाद येथील योगेश्वरी बोहरे ही तिरंगा फडकणार आहे. यासाठी लागणारी आर्थिक मदतही जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी मदत केली होती. या उंच शिखरावर स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवून ऑलिम्पिक वीरांना मानवंदना करून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा तिचा मानस आहे.
किलिमंजारो शिखरावर फडकवणार तिरंगा -
खेळांमध्ये जगात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा नुकत्याच संपल्या आहेत. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे. त्यानिमित्ताने या सर्व सहभागी खेळाडूंना मानवंदना देण्यासाठी आणि पुढील ऑलिम्पिक स्पर्धेसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने औरंगाबाद येथील योगेश्वरी बोहरे ही किलिमांजारो या शिखरावर तिरंगा फडकवणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिले प्रोत्साहन
बीएससीचे शिक्षण घेत असलेली 18 वर्षीय योगेश्वरी बोहरेचा किलिमांजारो या दक्षिण आफ्रिकेतील सर्वात उंच शिखरावर तिरंगा फडकवण्याचा मानस होता. या मानसाला पाठबळ देत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी तिला आर्थिक मदत केली. आणि ती करत असलेल्या कामाला प्रोत्साहन दिले होते.