औरंगाबाद - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक परप्रांतीय कामगार राज्यात ठिकठिकाणी अडकून पडले होते. या नागरिकांना आपापल्या गावी पाठवण्यासाठी औरंगाबादहून पहिली रेल्वे आज (गुरुवार) पाठवण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात बाराशे लोकांना स्वगृही पाठवण्यात आले असून ही रेल्वे विनाथांबा भोपाळला जाणार आहे. मध्यप्रदेश सरकारने राज्यात अडकलेल्या या लोकांना परत आणण्यासाठी एक कोटी रुपये रेल्वेकडे जमा केले. त्यामुळे या सर्व लोकांना पास देण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या सर्वांना रेल्वेत बसवण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिली.
औरंगाबादहून मध्यप्रदेशला पहिली रेल्वे रवाना, पहिल्या टप्प्यात बाराशे लोक परतणार स्वगृही - कोरोना लॉकडाऊन
लॉकडाऊनमुळे औरंगाबादेत अडकलेल्या लोकांना आपल्या गावी जायचे असल्यास नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या संख्येने परप्रांतीय नागरिकांनी प्रवासासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार दोन रेल्वे पाठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
![औरंगाबादहून मध्यप्रदेशला पहिली रेल्वे रवाना, पहिल्या टप्प्यात बाराशे लोक परतणार स्वगृही Train from Aurangabad to Madhya Pradesh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7103520-thumbnail-3x2-aa.jpg)
हेही वाचा...छत्तीसगडमध्ये विषारी वायू गळती, सात जण गंभीर जखमी
लॉकडाऊनमुळे औरंगाबादेत अडकलेल्या लोकांना आपल्या गावी जायचे असल्यास नोंदणी करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर मोठ्या संख्येने परप्रातीय नागरिकांनी प्रवासासाठी नोंदणी केली होती. त्यानुसार दोन रेल्वे पाठवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पहिल्या टप्प्यात मध्यप्रदेशच्या भोपाळ येथे रेल्वे पाठवण्यात आली असून शुक्रवारी जबलपूर येथे दुसरी रेल्वे पाठवण्यात येणार आहे. रेल्वेने जात असलेल्या सर्वच प्रवाशांची रेल्वे स्थानकावर तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना गाडीमध्ये जेवण आणि पाण्याची, सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. अद्याप अनेक लोक प्रतीक्षा यादीत असून नियमाने सर्व व्यवस्था झाल्यावर त्यांना सोडण्यात येईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांनी दिली.