महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

क्लेशदायक! खड्ड्यांमुळे महिलेची वाहनातच प्रसुती, अर्भक दगावले! - women gave birth to a child in vehicle due to potholes

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बसलेल्या हादऱ्यांनी गर्भवती महिलेची वाहनातच प्रसूती होऊन नवजात अर्भक दगावल्याची क्लेशदायक घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेवर सगळीकडून शोक आणि संताप व्यक्त होताना दिसत आहे.

क्लेशदायक! खड्ड्यांमुळे महिलेची वाहनातच प्रसुती, अर्भक दगावले!
क्लेशदायक! खड्ड्यांमुळे महिलेची वाहनातच प्रसुती, अर्भक दगावले!

By

Published : Oct 6, 2021, 11:58 AM IST

Updated : Oct 6, 2021, 12:08 PM IST

वैजापूर (औरंगाबाद): रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बसलेल्या हादऱ्यांनी गर्भवती महिलेची वाहनातच प्रसूती होऊन नवजात अर्भक दगावल्याची क्लेशदायक घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातून समोर आली आहे. या घटनेवर सगळीकडून शोक आणि संताप व्यक्त होताना दिसत आहे.

वैजापूर तालुक्यातील शिऊर बंगला येथील रहिवासी समीर शेख यांची पत्नी साजिया गर्भवती होती. सोमवारी रात्री साजिया यांना प्रसुती कळा सुरू झाल्या. यानंतर समीर तत्काळ एका खासगी वाहनातून पत्नीला प्रसुतीसाठी औरंगाबादला घेऊन निघाले. यावेळी वाहन झोलेगाव पाटीजवळ आले असता रस्त्यावरील एका खड्ड्यात गाडी आदळली आणि याचा जोराचा हादरा साजिया यांना बसला. यातच त्यांची प्रसूती झाली, मात्र वेळेत रुग्णालय न गाठता आल्याने त्यांचे नवजात अर्भक दगावले. रात्री दीडच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, समीर व शाजिया हे मुळचे उत्तर प्रदेशातील असून उदरनिर्वाहासाठी ते शिऊर इथे आले आहेत.

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडलेल्या या घटनेवर आता परिसरासह तालुक्यातून शोक आणि संताप व्यक्त होताना दिसत आहे. रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम लवकरात लवकर केले जावे अशीही मागणी आता सामान्यांमधून केली जात आहे.

हेही वाचा -औरंगाबाद : वैजापूर तालुक्यात भीषण अपघात; बसच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Last Updated : Oct 6, 2021, 12:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details