औरंगाबाद- कोरोनामुळे पतीचे निधन झाल्यावर पत्नीने आपल्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या पुंडलीकनगर परिसरात घडली. तर या घटनेत मुलगा सुदैवाने बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. महिलेने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून पतीशिवाय आपण जगू शकत नसल्याने आत्महत्या करत असल्याचं नमूद करत आपल्या आईची आणि कुटुंबियांची माफी मागितली आहे.
महिलेने आपल्या दोन मुलांच्या हाताच्या नस कापून नंतर गळफास घेतल्याचं सकाळी समोर आलं. समिना रुस्तम शेख (42), आयेशा रुस्तम शेख (17) अशी मृत मायलेकींची नावे आहेत तर समीर रुस्तम शेख हा बचावला आहे.
या घटनेची मिळालेली माहिती अशी, की समिना यांचे पती रुस्तम शेख बांधकाम व्यावसायिक होते. 25 वर्षांपूर्वी त्यांनी प्रेमविवाह केला होता. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्याने ते तीन महिने घराच्या बाहेर पडले नव्हते. मात्र 1 जून नंतर त्यांनी आपलं काम सुरू केले. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यातच 31 जुलैला त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे समिना व्यथित झाल्या होत्या. आपण आता जगणार नाही असे त्यांनी बोलून दाखवले होत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांची समजूत काढली होती.
कोरोनामुळे पतीचे निधन, औरंगाबादमध्ये महिलेने मुलांसह केली आत्महत्या - aurangabad corona patient died news
मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत जेवण केलं. त्या आपल्या मुलांना घेऊन आपल्या घरी परत आल्या. रात्री त्यांनी आपल्या मुलांच्या हाताच्या नस कापल्या, त्यानंतर आपली मुलगी आयेशा सोबत गळफास घेतला.
मंगळवारी रात्री त्यांनी आपल्या कुटुंबियांसोबत जेवण केलं. आणि त्या आपल्या मुलांना घेऊन आपल्या घरी परत आल्या. रात्री त्यांनी आपल्या मुलांच्या हाताच्या नस कापल्या, त्यानंतर आपली मुलगी आयेशा सोबत गळफास घेतला. दुपार पर्यंत दरवाजा न उघडल्याने आसपासच्या नागरिकांनी दरवाजा वाजवला मात्र कोणी प्रतिसाद देत नसल्याने नागरिकांनी दरवाजा तोडला. यावेळी समिना आणि आयेशा गळफास घेतलेल्या अवस्थेत तर मुलगा समीर बेडवर पडलेला आढळून आला. त्यांना पोलिसांच्या मदतीने घाटी रुग्णालयात नेले असता आयेशा आणि समिना मृत झाल्याच डॉक्टरांनी घोषित केले तर समीरवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या घटनेनंतर पोलिसांनी घराची झडती घेतली असता समिनाने लिहिलेले पत्र आढळून आले. या पत्रात तिने आपल्या आईची माफी मागितली असून रुस्तम यांच्याशिवाय पाच दिवस कसे काढले सांगू शकत नाही, त्यांच्याशिवाय आम्ही जगू शकत नाही असे या पत्रात समिनाने लिहिलं आहे. या प्रकरणी पुंडलिक नगर पोलीसात नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.