औरंगाबाद -बिडकिन परिसरात २१ वर्षीय विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवार घडली. मात्र, आमच्या मुलीला सासरच्या लोकांनी मारून टाकल्याचा आरोप करत सासरकडील मंडळींना घाटी रुग्णालयात बेदम मारहाण करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी झाला होता विवाह -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खातून मुक्तर शेख (२१) रा.मुलानी वडगाव ता.पैठण असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, मंगळवार दि.१८ रोजी खातून या घरात असताना त्यांना विजेचा धक्का लागला. त्यानंतर त्यांना तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांचा काही दिवसांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक महिन्याचा मुलगा आहे. या प्रकरणी बिडकिन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.