औरंगाबाद - महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच राज्यात आज दुपारपर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यानंतर औरंगाबादमध्येही एका कोरोनाबाधित ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबादेत कोरोनाचा पहिला बळी, ५८ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू - कोरोनामुळे मृत्यू औरंगाबाद
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यातच राज्यात आज दुपारपर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुण्यानंतर औरंगाबादमध्येही एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा...देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३,३७४; आतापर्यंत ७७ लोकांचा बळी..
या व्यक्तीवर औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्याल रुग्णालयात (घाटी) 8 दिवसांपासून उपचार सुरू होते. या व्यक्तीची कोरोना चाचणी झाली होती व त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचबरोबर त्यांना मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा देखील त्रास होता. उपचारा दरम्यान रविवारी दुपारी कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी औरंगाबादेत कोरोनाबाधित पहिली रुग्ण पूर्णपणे बरी झाली होती. औरंगाबादेत कोरोनाचा हा पहिला बळी ठरला आहे.