महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मराठा आरक्षण : विनोद पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. याची माहिती विनोद पाटील यांनी स्वतः बुधवारी माध्यमांना दिली. न्यायालयात कुणी आरक्षणाविषयी याचिका केल्यास आमचं म्हणणंही ऐकावं म्हणून हे कॅव्हेट दाखल केल्याचं पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट

By

Published : Aug 25, 2021, 5:41 PM IST

Updated : Aug 25, 2021, 5:46 PM IST

औरंगाबाद : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. याची माहिती विनोद पाटील यांनी स्वतः बुधवारी माध्यमांना दिली. न्यायालयात कुणी आरक्षणाविषयी याचिका केल्यास आमचं म्हणणंही ऐकावं म्हणून हे कॅव्हेट दाखल केल्याचं पाटील म्हणाले.

मराठा आरक्षण : विनोद पाटील यांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट
कुणीही आता न्यायालयात जाऊ नयेलोकसभेत कायदा करण्यात आल्यानंतर, 105 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळाले आहेत. मात्र या निर्णयाला कुणी कोर्टात आव्हान देऊ नये म्हणून मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षणाविषयी काही निर्णय होणार असल्यास अनेक लोक याला विरोध करण्यासाठी कोर्टात जातात. मात्र हे होऊ नये आणि न्यायालयाने आधी आमचं ऐकावं म्हणून हे कॅव्हेट दाखल केल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलंय.
Last Updated : Aug 25, 2021, 5:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details