महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शाहू जयंतीला औरंगाबादेत शिवसंग्रामचा मेळावा, मराठा आंदोलन करणार तीव्र

विनायक मेटे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार निष्क्रिय राहिले आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने कोर्टामध्ये योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे समाजात संताप वाढत आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, मुळात हे फक्त नाटक होतं' अशी टीका मेटे यांनी केली.

विनायक मेटे
विनायक मेटे

By

Published : Jun 14, 2021, 7:04 AM IST

औरंगाबाद- मराठा समाजाने संघर्षाला तयार रहावे यासाठी राज्याचा दौरा सुरू केला आहे. दौऱ्यात नागरिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. जिल्हाभर मेळावे घेतले जाणार आहेत. यानंतर महसूल कार्यालयांवर मोर्चे काढले जातील. आमचे आंदोलन मूक नाही तर बोलके असणार आहेत, असे म्हणत विनायक मेटे यांनी खासदार संभाजीराजेंना टोला लगावला.

विनायक मेटे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 'सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकार निष्क्रिय राहिले आहे. यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने कोर्टामध्ये योग्य बाजू मांडली नाही. त्यामुळे समाजात संताप वाढत आहे. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्भव ठाकरे आणि त्यांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, मुळात हे फक्त नाटक होतं' अशी टीका मेटे यांनी केली.

औरंगाबादेत बोलतना विनायक मेटे..

पहिला मेळावा औरंगाबादमध्ये..

औरंगाबादमध्ये शिवसंग्रामचा पहिला मेळावा घेणार आहोत. २६ जून रोजी औरंगाबादमध्ये मोठा मेळावा होईल, शाहू महाराजांच्या स्मृती निमित्त हा मेळावा असणार आहे. तसेच २७ जून रोजी मुंबईमध्ये १० हजार मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले आहे, अशी माहितीही मेटेंनी दिली. माओवाद्यांच्या भूमिकेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, नाहीतर माओवाद्यांच्या जाळ्यात तरुण अडकू शकतात. त्यामुळे राज्याला याची किंमत चुकवावी लागू शकते, असा इशाराही मेटेंनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details