महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

धूत बंधुंना अटक करुन मालमत्ता जप्त करा; औरंगाबादेत व्हिडिओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

औरंगाबादमधील व्हीडीओकॉन कंपनीतील कर्मचाऱ्यांचे 58 हजार 730 कोटी रुपयांचे वेतन थकीत आहे. गेल्या 17 महिन्यांपासूनचे थकीत वेतन मिळावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयावर मोर्चा काढला. राजकुमार धुत यांना अटक करुन त्यांची मालमत्ता जप्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

व्हीडीओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन
व्हीडीओकॉन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By

Published : Jan 24, 2020, 1:08 PM IST

औरंगाबाद - गेल्या 17 महिन्यांपासून थकीत वेतन न मिळाल्यामुळे व्हिडिओकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयावर मोर्चा काढला. राजकुमार धुतला अटक करुन मालमत्ता जप्त करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांची जोरदार घोषणाबाजी कर्मचाऱ्यांनी केली.

धूत बंधुंना अटक करुन मालमत्ता जप्त करा

थकीत वेतनासाठी व्हीडीओकॉन कामगारांच्या उपोषणाला १५० दिवस पुर्ण झाले. शिवाय भीक मांगो आंदोलन करुन धूत बंधूंना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत 721 रुपये पाठवण्यात आले. मात्र उपोषणाची कोणीही दखल घेतली नाही. अखेर संतप्त कर्मचाऱ्यांनी आयुक्तालयावर मोर्चा काढला. मोर्चाचा मार्ग क्रांती चौकातून पैठण गेट, टिळक पथ, खडकेश्र्वर, सिटी चौक, शहागंज, फाजल पुरा तसेच विभागीय आयुक्त कार्यालय असा होता. यावेळी प्रचंड घोषणबाजी करण्यात आली.

राजकुमार धूतला अटक करुन ५८ हजार ७३० कोटी रुपयांचे कर्ज वसूल करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कामगारांना भेटायला वेळ द्यावा अशा मागण्या कर्मचाऱ्यांनी यावेळी केल्या. कामगार उपाशी असतांना धूत बंधू ऐशोआरामात आहेत. ते शिवसेनेचे राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे शिवसेनेला धूत बंधूंचा हा दरोडा आणि कामगारांना उपाशी ठेवणे मान्य आहे का? असा सवालही कामगारांनी उपस्थित केला. मात्र याबाबत शिवसेनेचे मौन आहे. याबाबत २४ डिसेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठवण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. धूत बंधू करीत असलेल्या छळाला शिवसेनेचा पाठींबा आहे का? असा प्रश्नही कामगार उपस्थित करीत आहेत. शिवाय चंदा कोचर यांच्यावरील कारवाईप्रमाणे धूत बंधूवर देखील कारवाई करावी. धूत बंधुंना अटक करून त्यांची मालमता जप्त करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details