औरंगाबाद -परिसरात राहणाऱ्या १५ वर्षीय शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या नराधमाला वेदांतनगर पोलिसांनी बुधवारी (२ जून) रात्री ताब्यात घेतले.
हेही वाचा -शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स सुरुवातीला 350 अंकांनी वधारला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पोपट राजपूत -बीलवाल ( वय २७, रा. पदमपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पंधरा वर्षीय पीडिता दहावी वर्गात शिकते, तर आरोपी अजय हा बेरोजगार आहे. दरम्यान त्यांची ओळख झाली. यावेळी आरोपीने त्याचा मोबाईल क्रमांक पीडितेला देऊन तिला कॉल करायला सांगितले.
यादरम्यान, तिला त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी जवळीक साधली. तिचे अर्धनग्न छायाचित्र काढले. या छायाचित्राच्या आधारे तिला ब्लॅकमेल करून आरोपी तिला भाड्याने घेतलेल्या खोलीत घेऊन जात असे आणि तिच्यावर अत्याचार करत असे. या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने ही बाब तिच्या नातेवाईकांना सांगितली.
हेही वाचा -ठाण्यात हाय-प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, २ प्रसिद्ध अभिनेत्रींसह ५ अटकेत, १ लाख ८० हजारात झाला होता सौदा
पीडितेच्या आईने वेदांतनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पीडितेच्या तक्रारीची दखल घेत तत्काळ पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे आणि कर्मचारी यांनी तातडीने कारवाई करत बुधवारी रात्री आरोपीला ताब्यात घेतले.