महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'वंचित'कडून एमआयएमला आठ जागांची ऑफर; एमआयएम-वंचित वेगळे लढणार? - वंचित आणि एमआयएम जागा वाटप बातमी

वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम विधानसभा निवडणूक वेगवेगळी लढण्याची शक्यता आहे. वंचित आघाडीने एमआयएमला ८ जागा देण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वंचित कडून एमआयएमला आठ जागांची ऑफर

By

Published : Sep 4, 2019, 6:05 PM IST

Updated : Sep 4, 2019, 7:05 PM IST

औरंगाबाद -वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम आगामी विधानसभा निवडणूक वेगवेगळी लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित आघाडीने एमआयएमला 8 जागा देण्याचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे इतक्या कमी जागांवर निवडणूक लढवण्यास एमआयएम तयार नसल्याने वेगळे लढण्याचा विचार एमआयएम करणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

एमआयएमचे प्रदेशध्यक्ष खासदार इम्तियाज जलील

लोकसभा निवडणुकीत राज्यात वेगळा पर्याय दिल्यानंतर वंचित आणि मित्रपक्ष असलेल्या एमआयएम पक्षाने विधानसभा निवडणुकीत सुरुवातीला 98 जागांची मागणी केली होती. नंतर या यादीत सुधार करून 76 जागा देण्याची मागणी एमआयएमने केली. गेली अनेक दिवस वंचितकडून जागावाटप जाहीर केले जाईल याची प्रतीक्षा एमआयएम करत आहे. मात्र, वंचितने 8 जागा देण्याची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएमला हा प्रस्ताव मान्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

याआधी एमआयएम पक्षातर्फे पत्रकार परिषद घेऊन 2014 साली 24 जागांवर निवडणूक लढवली होती, त्याठिकाणी आमची तयारी असून त्या जागा आम्हीच लढवणार, असे एमआयएमने जाहीर केले होते. इतकेच नाही तर जागा वाटपावर अडून बसणार नाही. मात्र, समाधानकारक जागा मिळाव्यात, अशी आशा व्यक्त केली होती. अशात किमान 50 जागा मिळाव्या, अशी अपेक्षा एमआयएमला होती. जागा वाटप रखडलेले असल्याने एमआयएम जागा वाटप लवकर जाहीर करा आणि कामाला लागा, असे म्हणत असताना वंचितने केवळ आठ जागा देऊ केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत अद्याप कुठलीही ऑफर मिळाली नसून आम्ही ताकत असलेल्या जागांवर निवडणूक लढवण्यास आग्रही असल्याचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.

Last Updated : Sep 4, 2019, 7:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details