महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Unique Competition विद्यार्थ्यांसाठी रंगली अनोखी भाकरी थापणे स्पर्धा - students in Aurangabad

Unique Competition विद्यार्थ्यांमध्ये कला गुणांना वाव मिळावा याकरिता शाळांमधे विविध उपक्रम राबवले जातात. असाच आगळावेगळा उपक्रम राबवला तो सिडको येथील ज्ञानेश विद्यामंदिर माध्यमिक शाळेत Gyanesh Vidyamandir Secondary School at CIDCO. कामाची सवय मुलांना लागावी करिता 'भाकरी थापणे 'ही स्पर्धा घेण्यात आली आहे.

Unique Competition
Unique Competition

By

Published : Sep 24, 2022, 5:55 PM IST

औरंगाबाद विद्यार्थ्यांमध्ये कला गुणांना वाव मिळावा याकरिता शाळांमधे विविध उपक्रम राबवले जातात. असाच आगळावेगळा उपक्रम राबवला तो सिडको येथील ज्ञानेश विद्यामंदिर माध्यमिक शाळेत Gyanesh Vidyamandir Secondary School at CIDCO. कामाची सवय मुलांना लागावी करिता 'भाकरी थापणे 'ही स्पर्धा घेण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी थापल्या भाकऱ्यासिडको येथील ज्ञानेश विद्यामंदिरात आगळा वेगळा उपक्रम राबवण्यात आला. लहान मुलांनी चक्क भाकरी थापून या उपक्रमात सहभाग नोंदवला. आजच्या विज्ञान व तंत्रज्ञान युगामध्ये प्रत्येकाने कोणत्याही कामाला कमी लेखू नये, घरातील छोटे- मोठे काम करण्याची लाज वाटू नये. घरी आपल्या आजीला, आईला, ताईला कामामध्ये आपल्या परीने छोटीछोटी मदत व्हावी. अभ्यासाबरोबरच अंग मेहनतीची देखील सवय असावी. यासाठी घरातील छोटी छोटी कामे, जसे की कपड्यांच्या घड्या घालने, भांडे व्यवस्थित जागेवर लावून ठेवणे. घर झाडून घेणे, घर स्वच्छ ठेवणे, घरामध्ये पसारा होणार नाही, याची सगळ्यांनी मिळून काळजी घेणे. स्वयंपाक घरातील कामाची छोटी- छोटी मदत जसे की लसुन सोडले, भाजी निवडणे, भाजी धुवून स्वच्छ करणे. या बाबी स्वावलंबी जीवन जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. या करिता भाकरी थापण्याचा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात इयत्ता आठवीमधील 45 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

विद्यार्थ्यांसाठी रंगली अनोखी भाकरी थापणे स्पर्धा

मुलांमधे कामाची सवय लावण्यासाठी उपक्रमया स्पर्धेचे उद्दिष्ट सांगताना मुख्याध्यापक रामनाथ पंडोरे यांनी सांगितले की, आपले स्वर्गीय बापुजी महात्मा गांधी यांनी देखील स्वावलंबनाचे धडे आपल्याला दिलेले आहेत. याचीच शिकवण शालेय स्तरापासूनच झाली पाहिजे. जेणेकरून या बालमनावर झालेले संस्कार हे आयुष्यभर टिकून राहतात, असे त्यांनी सांगितले आहे. उन्नती शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश विद्यामंदिर, सिडको माध्यमिक शाळेत ज्वारीची, बाजरीची भाकरी बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा खास मुलांसाठी आयोजित करण्यात आली होती. यावेळी या स्पर्धेचे उदघाटन उन्नती शिक्षण संस्थेच्या सचिव मीनाक्षी विटोरे यांनी केले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र विटोरे, उपाध्यक्ष पूजा पऱ्हे, मुख्याध्यापक रामनाथ पंडुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ABOUT THE AUTHOR

...view details