औरंगाबाद -बायकोला पर्स घ्यायची म्हणून एकाने चक्क मंदिरात मूर्ती चोरल्याचा धक्कादायक प्रकार शहागंज ( Theft case in Aurangabad ) परिसरात घडला. पोलिसांनी अवघ्या काही तासात चोराला जेरबंद केले आहे. जावेद जुम्मा पठाण असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
चेलीपुरा भागात राहणाऱ्या जावेद जुम्मा पठाण याला पत्नीच्या हट्टामुळे पोलीस ठाण्याची हवा खावी ( youth steals money for wifes purse ) लागली. मागील काही दिवसांपासून जावेद हा बेरोजगार होता. बायकोसारखी पैशांची मागणी करायची असल्यामुळे तो त्रस्त होता. त्यात शनिवारी बायकोने 5 हजारांची महागडी पर्स घेऊन द्यावा, यासाठी त्याच्याकडे हट्ट धरला. इतकेच नाही तर पर्स घेतल्याशिवाय घरीच यायचे नाही, अशी तंबी दिली. त्यामुळे जावेद हतबल झाला.
हेही वाचा-Thane Crime News : सेल्फीच्या नादात 13 वर्षीय मुलाने गमावला जीव
शहागंज भागात फिरत असताना त्याला झुलेलाल मंदिर ( money stolen from Zulelal temple ) दिसले. फारशी सुरक्षा नसल्याचे त्याने पाहिले. परिसरातील व्यापारी दानपेटीत पैसे टाकत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दानपेटी फोडायची ठरविले. जावेदने दानपेटी फोडून 5 हजार रुपये लंपास केले. मंदिरातील चांदीची मूर्ती आणि दिवेही चोरले. ही बाब सकाळी पुजाऱ्यांच्या लक्षात आले.