महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case : धमकी मिळालेल्या तक्रारदाराच्या घराची रेकी; अमरावती पोलीस सतर्क - A total of seven people have been arrested in the Umesh Kolhe murder case

नुपूर शर्मा यांच्या ( Nupur Sharma case ) समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे अमरावतीतील एका व्यक्तीच्या घराची सहा जणांनी रेकी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकारामुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Reiki of the threatened plaintiff's house
धमकी मिळालेल्या तक्रारदाराच्या घराची रेकी

By

Published : Jul 9, 2022, 5:24 PM IST

अमरावती -अमरावती शहरात एकूण तीन व्यक्तींना नुपूर शर्मा ( Nupur Sharma case ) यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे धमकी मिळाली असल्याचे समोर आले असून एकाच व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यावर आता त्याच्या घराची सहा जणांकडून रेकी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे शहरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अमरावतीतील एका व्यक्तीच्या घराची सहा जणांनी रेकी केल्याचे प्रकरण

काय आहे प्रकरण -नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे ( Nupur Sharma Social media Post) अमरावती शहरातील औषधी व्यावसायिक उमेश कोल्हे ( Pharmacist Umesh Kolhe ) यांची 21 जून रोजी रात्री साडेदहा वाजता घंटी घड्याळ परिसरात हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात एकूण सात जणांना ( seven arrested Umesh Kolhe murder case ) पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाचा तपास आता अमरावती पोलिसांकडून एएनआयकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान अमरावती शहरात एकूण तीन व्यक्तींना नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे धमकी मिळाली असल्याचे समोर आले आहे. एकाच व्यक्तीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रामपुरी कॅम्प परिसरातील या व्यक्तीला दिवसभर एका पोलिसाचे संरक्षण देण्यात आले. शुक्रवारी रात्री ही व्यक्ती आपल्या दुकानातून घरी पोहोचली असताना त्यांच्या घराची सहा जणांनी रेकी केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्या संरक्षणासाठी असणारा पोलीस कर्मचारी घरी जाण्यासाठी निघाला असताना त्याला एकूण सहा जण संशयित्रीच्या तक्रारदार व्यक्तीच्या घराच्या परिसरात दिसले. या सहाही व्यक्तींची हालचाल संशयास्पद असल्याचे, कळतात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी याबाबत वरिष्ठांना सूचित केले.

पोलिसांनी प्रकरण घेतले गांभीर्याने -नुपूर शर्मा यांच्या समर्थन केल्यामुळे धमकी मिळालेल्या व्यक्तीने पोलिसात तक्रार दिली असताना त्याच्या घराची रेकी करण्यात आल्यामुळे पोलिसांनी हे संपूर्ण प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. गाडगे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संबंधित व्यक्तीचे घर असून शुक्रवारी रात्री पोलीस उपायुक्त मकानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त पूनम पाटील यांच्यासह गाडगे नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चोरमले यांनी बऱ्याच उशिरापर्यंत संशयित सहा जण कोण आहेत याचा तपास केला. तक्रारदार व्यक्तीच्या घरालगत असणारे सीसीटीव्ही कॅमेरा देखील पोलीस तपासून पाहत आहे. शनिवारी सुद्धा दिवसभर पोलीस उपायुक्त मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील हे गाडगे नगर पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.

त्या व्यक्तीच्या सुरक्षित वाढ -नुपूर शर्मा यांच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्यामुळे धमकी मिळालेल्या व्यक्तीच्या सुरक्षेत पोलिसांनी वाढ केली आहे. त्या व्यक्तीला आता 24 तास पोलीस संरक्षण देण्यात आले असून, त्याच्या दुकानालगत तसेच घरी देखील 24 तास पोलिसांचे संरक्षण राहणार आहे.

सात जणांना झाली होती अटक -एनआयए कडून आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये इरफान खान (32), मुदस्सर अहमद उर्फ ​​सोनू रजा शेख इब्राहिम (22), शाहरुख पठाण उर्फ ​​बादशाशा हिदायत खान (25), अब्दुल तौफिक उर्फ ​​नानू शेख तस्लीम (24), शोएब खान उर्फ ​​भुर्या साबीर खान (22), अतीब रशीद आदिल रशीद (22), युसूफ खान बहादूर खान (44) यांचा समावेश आहे.



हत्येचा तपास एनआयएकडे - दरम्यान,नुपूर शर्मा यांचे समर्थन केले म्हणून अमरावतीच्या मेडिकल व्यावासायिक असलेल्या उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या इरफान शेख याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. इरफान शेख हा रहबर नावाची एक एनजीओ चालवतो. त्यानेच आरोपींना उमेश कोल्हे यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता, हे समोर आले आहे. त्यानंतर आरोपींनी 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या केली. प्रथमदर्शनी ही हत्या लूटपाट करण्याच्या उद्देशाने झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. मात्र आज तब्बल 12 दिवसांच्या तापसानंतर अमरावती शहर पोलिसांनी ही हत्या नुपूर शर्मा यांच्या पोस्ट व्हायरल केल्यामुळेच झाली असल्याचे स्पष्ट केले. केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आल्याचे ट्विट केले आणि त्यानंतर अमरावती पोलिसांनी ही माहिती दिली.

हेही वाचा -Thief Jumped Video : चोरी करायला गेलेल्या चोराची चौथ्या मजल्यावरुन उडी; उपचारादरम्यान मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details