महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Students In Ukraine : युक्रेनमध्ये अडकल्या औरंगाबादच्या दोन विद्यार्थिनी.. पालकांची धाकधूक वाढली.. - युक्रेनमधील लिविव शहर

एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी युक्रेनमध्ये गेलेल्या औरंगाबादमधील २ विद्यार्थिनींच्या पालकांची धाकधूक वाढली ( Students From Aurangabad Stranded In Ukraine ) आहे. या दोघींनाही लवकरात लवकर भारतात आणले जावे अशी अपेक्षा त्यांचे पालक व्यक्त करत आहेत.

श्रुतिकाचे आई वडील
श्रुतिकाचे आई वडील

By

Published : Feb 25, 2022, 4:56 PM IST

औरंगाबाद - युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक विद्यार्थी फसले आहेत. त्यात औरंगाबादच्या 2 विद्यार्थिनी फसल्या ( Students From Aurangabad Stranded In Ukraine ) आहेत. श्रुतिका आणि भूमिका या दोन्ही मैत्रिणी एमबीबीएस अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी युक्रेनमधील लिविव शहरात ( Liviv City Ukraine ) आहेत. युद्ध सुरु झाल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

युक्रेनमध्ये अडकल्या औरंगाबादच्या दोन विद्यार्थिनी.. पालकांची धाकधूक वाढली..

श्रुतिका सोबत आई वडील संपर्कात..

कालडा कॉर्नर परिसरात राहणारी श्रुतिका चव्हाण एमबीबीएसच्या अभ्यासासाठी ती तिच्या मैत्रिणीसोबत युक्रनमध्ये गेली असून, ती सध्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षात आहे. तिकडे युद्ध पेटलं असल्याने तिचे आई वडील चिंतेत आहेत. मात्र, रोज ते श्रुतिकाच्या संपर्कात आहेत. श्रुतिकाचे वडील हेमंत चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार तिथं त्यांना हॉस्टेलमध्ये रहायला सांगण्यात आलं आहे. खाण्याची अडचण नाही मात्र पाण्याची अडचण त्यांना भासते आहे. पाणी विकत घ्याव लागत आहे. त्यांना परत कसे यायचं कळत नसल्याने, पालकांची चिंता वाढली आहे. सध्या फोनवर बोलणं होत आहे मात्र, इंटरनेट बंद झाल्यास ती सोय सुद्धा बंद होईल, अशी भीती पालकांना आहे. त्यामुळं भारत सरकारने आमच्या मुलांची सुटका करावी अशी पालकांची मागणी आहे.

श्रुतिका देत आहे हिंमत..

श्रुतिका आणि भूमिका या दोन विद्यार्थिनी युक्रेनमध्ये अडकल्या आहेत. त्या कशा असतील याची चिंता आई वडिलांना लागली आहे. मात्र त्या दोघीही फोनवर बोलताना कुटुंबियांना हिंमत देत आहेत. त्या राहत असलेल्या लिविव शहरात ताणावं नाही, आम्ही सुरक्षित आहोत असं त्या सांगत आहेत. त्यांना वाहनाने इतर देशात आणून तिथून विमानाने पाठवण्याबाबत हालचाली होत आहेत. भारतीय दुतावासाने याबाबत माहिती जमा केली असून, लवकरच त्या परत येतील असा विश्वास श्रुतिका आणि भूमिका यांच्या पालकांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details