महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Dec 17, 2021, 3:42 PM IST

Updated : Dec 17, 2021, 6:38 PM IST

ETV Bharat / city

Aurangabad Murder : हत्येच्या दोन घटनेने हादरले औरंगाबाद शहर; कारण अस्पष्ट, आरोपींचा शोध सुरू

शहरात हिमायत बाग येथे एका २२ वर्षीय तरुणाचा ( 22 Year Young Boy Murder ) गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसऱ्या घटनेत ६० वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या ( Women deadBody Found In Aurangabad ) घरात आढळून आला आहे. शहरात घडलेल्या हत्येच्या ( Aurangabad Murder ) या दोन घटनेने खळबळ उडाली आहे.

Young Boy Murder in Aurangabad
Young Boy Murder in Aurangabad

औरंगाबाद -शहरात हिमायत बाग येथे एका २२ वर्षीय तरुणाचा ( 22 Year Young Boy Murder ) गळा चिरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसऱ्या घटनेत ६० वर्षीय महिलेचा मृतदेह तिच्या ( Women deadBody Found In Aurangabad ) घरात आढळून आला आहे. शहरात घडलेल्या हत्येच्या ( Aurangabad Two Murder ) या दोन घटनेने खळबळ उडाली आहे.

घटनास्थळ

हिमायत बाग येथे २२ वर्षीय तरुणाची हत्या -

हिमायत बाग येथे एका २२ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे. कृष्णा शेषराव जाधव (22) रा. सुभाषचंद्र बोसनगर, असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांचा तपास सुरू आहे. दरम्यान, हा तरुण बुधवारी रात्री 9.30 च्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाला जातो सांगून वडिलांच्या दुकानातून निघाला होता. रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्याने घरच्यांनी त्याचा शोध घेतला. त्याचा फोनही बंद असल्याने कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना हिमायत बाग येथे क्रिष्णाचा मृतदेह आढळून आला.

करोडी शिवारातील आढळला महिलेचा मृतदेह -

तर अन्य एका घटनेत दौलताबाद पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या करोडी शिवारातील एका घरात 60 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. बार्डाबाई गोविंद नरवडे (६०), असे या मृत महिलेचे नाव असून ही महिला मुलाच्या वर्षश्राद्धासाठी शहरातून गावी आली होती. तीचा दुसरा मुलगा उस तोडणीसाठी गेला असता, त्याच्या पत्नीने शेजारी फोन करून सासूबद्दल विचारणा केली. तसेच त्यांना घरी जाऊन बघायला सांगितले. त्यावेळी शेजाऱ्यांना तेथे महिलेचा मृतदेह सापडला. पोलीस या घटनेचा तपास करत असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

हेही वाचा - Tukaram Supe arrested : टीईटी पेपर फुटी प्रकरणी राज्यपरीक्षा परिषदेचे आयुक्त सुपे यांच्यासह दोघांना अटक

Last Updated : Dec 17, 2021, 6:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details