औरंगाबाद- जिल्ह्यात दोन दिवसांची टाळेबंदी पाळण्यात येत आहे. त्यानुसार शनिवारी सकाळपासूनच नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले. वाढणारी रुग्णसंख्या पाहता कडक निर्बंध लावण्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शुक्रवारी दिवसभरात 1251 नवे कोरोना रुग्ण आढळून आले तर पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 642493 इतकी झाली असून 53498 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहेत. सध्या 9357 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या 1388 इतकी झाली आहे. रोज नव्याने हजाराच्यावर रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढत चालला आहे.