औरंंगाबाद -अवैधरित्या गुटख्याचा साठा करुन विक्री करण्यासाठी आलेल्यासह दोन जणांना पुंडलिकनगर पोलिसांनी गारखेडा परिसरातून गुरूवारी (दि.२४) ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांच्या ताब्यातून एक दुचाकी व गुटख्याचा साठा असा एकूण ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी दिली.
गुटख्याचा साठा करुन विक्री करणारे दोघे जेरबंद; दुचाकीसह ७० हजाराचा मुद्देमाल जप्त
गारखेड्यात पोलिसांनी दुचाकीवर आलेल्या शेख अब्दुल याला सापळा रचून पकडले. त्याच्या जवळील गोणीची झडती घेतली असता, त्यामध्ये जवळपास ४५ हजार रूपये किमतीचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी विचारपूस केली असता शेख अब्दुल याने सुरज खोलवाल यांचे नाव सांगितले. पोलिसांनी खोलवर यांच्या सिडको एन-२ येथील घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून २५ हजार ४८४ रूपये किमतीचा गुटखा मिळून आला.
शेख अब्दुल शेख अजीज ( वय २६, रा. सिल्क कॉलनी, रेल्वे स्टेशन रोड) असे विक्रीसाठी आलेल्या तर सुरज मदतसिंग खोलवाल (वय ४७, रा. एन-२ सिडको) असे गुटख्यांचा साठा करणाऱ्याचे नाव आहे. गारखेडा परिसरात एक जण दुचाकीवर गुटखा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पुंडलिकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, जमादार बाळाराम चौरे, प्रविण मुळे, विलास डोईफोडे, जालींदर मान्टे, रवि जाधव, शिवाजी गायकवाड, राजेश यदमळ, कल्याण निकम, दिपक जाधव, महेश गोले, नंदा गरड आदींच्या पथकाने गारखेड्यात सापळा रचून दुचाकी क्रमांक (एमएच-२०-डीएच-११९४) वर आलेल्या शेख अब्दुल याला सापळा रचून पकडले. पोलिसांनी त्याच्या जवळील गोणीची झडती घेतली असता, त्यामध्ये जवळपास ४५ हजार रूपये किमतीचा गुटखा मिळून आला. पोलिसांनी विचारपूस केली असता शेख अब्दुल याने सुरज खोलवाल यांचे नाव सांगितले. पोलिसांनी खोलवर यांच्या सिडको एन-२ येथील घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून २५ हजार ४८४ रूपये किमतीचा गुटखा मिळून आला. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.