महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

तृतीयपंथीयांचा महिला तक्रार निवारण केंद्रासमोर गोंधळ, पोलिसांच्या मध्यस्थीने मिटला वाद

मानसिक व शारीरिक त्रास देणाऱ्या तृतीय पंथीय गुरूच्या त्रासाला कंटाळून (Transgenders Complaint of mental and physical abuse ) दहा ते पंधरा तृतीय पंथीयांनी महिला तक्रार केंद्रात ठिय्या मांडत गोंधळ घातला. यावेळ एका तृतीय पांथियाने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याने एकच गोंधळ उडाला.

Transgenders Complaint

By

Published : Dec 8, 2021, 4:55 PM IST

Updated : Dec 8, 2021, 8:00 PM IST

औरंगाबाद - तृतीय पंथीय गुरूवर कारवाई करा या मागणीसाठी दहा ते पंधरा तृतीय पंथीयांनी महिला तक्रार केंद्रात ठिय्या मांडत गोंधळ घातला. यावेळी एका तृतीय पांथियाने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने एकच गोंधळ उडाला. तृतीय पंथीय गुरूवर तात्काळ कारवाई करा, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी करत या तृतीय पंथीयांनी गोंधळ घातला होता. .

यावेळी गजरी, लाली, स्वाती, सोनी, निकिता, सोनाली, जोया यांच्यासह वीस ते पंचवीस तृतीय पंथीय यांनी महिला तक्रार केंद्रात ठिय्या मांडला होता.
महिला पोलिसांची मध्यस्थी -
दरम्यान या गुरुवर कारवाई करा, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्या, अशी मागणी या तृतीयपंथीय शिष्यांनी केली. दरम्यान या प्रकरणांमध्ये महिला तक्रार निवारण केंद्र (Women's Complaints Center ) व दामिनी पथकाच्या महिला पोलिसांनी हस्तक्षेप करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्याने प्रकरण मिटविण्यात आले.
तृतीयपंथीयांचा अंगावर रॉकेल ओतून घेत गोंधळ

Last Updated : Dec 8, 2021, 8:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details