औरंगाबाद - लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी ( Increase Vaccination Percentage ) मनपा आयुक्त आता थेट नागरिकांच्या घरी जात आहेत. मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय ( IAS Astik Kumar Pandey ) यांनी हर्सूल भागात जाऊन काही नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व ( Importance Of Covid Vaccination ) सांगितले. त्यांच्या इमारतीतच घरात काही नागरिकांचे लसीकरण करवून घेतले.
लसीकरणाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न
Aurangabad Vaccination Initiative : औरंगाबादेत लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी महापालिकेचे आयुक्त नागरिकांच्या दारी.. - Covid Vaccination Second Dose
औरंगाबाद शहरात कोविड प्रतिबंधक लसीकरण ( Covid Preventive Vaccination ) सुरु आहे. लसीकरणाची टक्केवारी वाढण्यासाठी ( Increase Vaccination Percentage ) सर्वांचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळेच महानगरपालिकेचे आयुक्त थेट नागरिकांच्या घरी गेले. तेथेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने लसीकरण करण्यात आले.
महानगरपालिकेच्यावतीने 'हर घर दस्तक' ( Har Ghar Dastak Initiative ), या मोहिमेंतर्गत नागरिकांच्या घरी जाऊन कोरोना लस घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच औरंगाबाद महानगरपालिका ( Aurangabad Municipal Corporation ) आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय हे कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना दुसरा डोस ( Covid Vaccination Second Dose ) घेण्यासाठी सतत आवाहन करत आहेत. मंगळवारी प्रशासक पांडेय यांनी हर्सूल आरोग्य केंद्र अंतर्गत सारा रिद्धी या परिसरात खाडेकर व इतर कुटुंबियांच्या घरी भेट दिली. कुटुंबीयांच्या ज्या सदस्यांनी दुसरी लस घेतली नव्हती. त्यांना दुसरी लस घेण्यास प्रोत्साहित केले.
घरातच घेतली लस -
प्रशासक पांडेय घरी येताच काही नागरिकांनी त्यांच्यासमोर लस घेतली. त्याचात मीरा नर्सिंग खाडेकर (44 वर्ष), आरती नर्सिंग खडेकर (21), मैथिली नाईक (20), विजय पुंगळे (21) यांचा समावेश आहे. यावेळी आरोग्य वैद्दकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा आणि आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.