महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Examination Center Issue : एकाच बाकावर तीन विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा; विद्यापीठाचा ढिसाळ कारभार - विजेंद्र काबरा महाविद्यालय परीक्षा गोंधळ

औरंगाबादमध्ये एकाच बाकावर तीन विद्यार्थ्यांनी ( Three students took the exam on the same bench ) बसून परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी बीसीएस, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीची परीक्षा ( Computer Science and IT Exams ) घेण्यात आली. अचानक विद्यार्थी संख्या अधिक आल्याने गोंधळ उडाला. यातून हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती आहे.

परीक्षा देताना विद्यार्थी
परीक्षा देताना विद्यार्थी

By

Published : Jun 2, 2022, 3:21 PM IST

Updated : Jun 2, 2022, 4:12 PM IST

औरंगाबाद - विजेंद्र काबरा महाविद्यालयात ( Vijendra Kabra College Aurangabad ) एकाच काबावर तीन विद्यार्थ्यांनी ( Three students took the exam on the same bench ) बसून परीक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी बीसीएस, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटीची परीक्षा ( Computer Science and IT Exams ) घेण्यात आली. मात्र अचानक विद्यार्थी संख्या अधिक आल्याने गोंधळ उडाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रासाला समोर जावे लागले. तर यातून सामूहिक कॉपीचा प्रकार देखील समोर आला.

आढावा घेताना प्रतिनिधी


अचानक वाढले विद्यार्थी :डॉ. विजेंद्र काबरा महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेत रोज 466 परीक्षेला बसतील अशी माहिती महाविद्यालयाला देण्यात आली होती. त्यानुसार 1 जूनपासून परीक्षा सुरू झाल्या. विद्यापीठाने महाविद्यालयाला दिलेल्या यादीनुसार 466 विद्यार्थी परीक्षा देतील म्हणून महाविद्यालयाने तशी तयारी केली. मात्र सकाळी 9 च्या सुमारास अचानक 600 नवीन विद्यार्थी हॉल तिकीट घेऊन आले. विद्यार्थी परीक्षेला आल्यावर ते वंचित राहू नये, म्हणून महाविद्यालयाने याबाबत विद्यापीठाला माहिती दिली. त्या व्यवस्थेत विद्यार्थी परीक्षेला बसवले. त्यात विद्यापीठाची चूक असल्याचे मत महाविद्यालय प्राचार्य सतीश सुराणा मांडले आहे.



200 विद्यार्थ्यांची नोंद नाही :परीक्षा सुरू असताना 200 विद्यार्थी असे होते, ज्यांच्याकडे परीक्षा देण्याचे हॉल तिकीट होते. मात्र त्यांचे यादीत नाव नव्हते. असे विद्यार्थी देखील अचानक आल्याने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्या आणखी वाढली. 600 विद्यार्थी परीक्षा देऊ शकतील अशी क्षमता असताना प्रत्यक्षात 1200 विद्यार्थी आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने परीक्षेला बसवावे लागले, अशी माहिती विजेंद्र काबरा महाविद्यालय प्राचार्य सतीश सुराणा यांनी दिली. तर याबाबत चौकशी करून अहवाल दिला जाईल. विद्यापीठाची चूक असेल तर त्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परीक्षा विभागाचे गणेश मांझा यांनी दिली आहे.

हेही वाचा -Sanjay Raut on BJP over Terrorism : केंद्रातले सरकार काश्मिरी जनतेचे, जवानांचे रक्षण करू शकत नाही - संजय राऊत

Last Updated : Jun 2, 2022, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details