औरंगाबाद - औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजीमहाराज यांचे नाव द्यावे अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. त्यावर केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी विमानतळाची अशी अधिसूचना आधीच काढण्यात आली आहे. (Airports Renamed Proposal In Maharashtra) देशातील सर्वच विमानतळाचे प्रस्ताव आहेत आणि ते एकत्रितच होतील. अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते औरंगाबादमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
सेना-भाजपात नामकरणावरून रस्सीखेच
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून, औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारला पाठवावा. (Airports Renamed Proposal Dr. Bhagwat Karad) आम्ही त्यावर तातडीने निर्णय घेऊ, एवढेच नव्हे तर लवकरच औरंगाबाद शहरातील चिकलठाणा विमानतळाचेही नामकरण छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करू अस केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भगवत कराड यांनी सांगितले आहे.
राज्यातील तीन विमानतळांचे नामकरणाचे प्रस्ताव
औरंगाबादच्या चिखलठाणा विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्यावे असा प्रस्ताव आलेला आहे. तर कोल्हापूर विमानतळाला छत्रपती राजाराम महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे. औरंगाबाद, कोल्हापूर आणि शिर्डी असे एकूण तीन विमानतळ तीन विमानतळ नामकरणाचे प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे प्राप्त आले आहेत. आणखी कोणत्या विमानतळाचे नाव बदलाचे प्रस्ताव आहेत, याबाबत विचारना करण्यात आली.