महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Threatening phone call to Rajendra Gaikwad: औरंगाबादेतून शिवसेना जिल्हा प्रमुखांना धमकी; सीडी प्रकरणातून राठोड समर्थकाचा जळपळाट - bjp forming a new government

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये संजय राठोड सामील असल्याने आता त्यांना विविध स्तरावर रोषाला सामोर जाव लागत आहे. शिवसेना ( Shiv Sena ) जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी संजय राठोड यांची एका वादग्रस्त प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आता त्यांना थेट औरंगाबादेतून धमकीचा फोन ( Threatening phone call to Rajendra Gaikwad ) आला आहे.

Rajendra Gaikwad
राजेंद्र गायकवाड

By

Published : Jun 30, 2022, 12:56 PM IST

यवतमाळ -शिवसेनेच्या बंडखोर आमदारांमध्ये संजय राठोड सामील असल्याने आता त्यांना विविध स्तरावर रोषाला सामोर जाव लागत आहे. शिवसेना ( Shiv Sena ) जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांनी संजय राठोड यांची एका वादग्रस्त प्रकरणाची सीडी आपल्याकडे आहे, असा गौप्यस्फोट केला आहे. त्यावर आता त्यांना थेट औरंगाबादेतून धमकीचा फोन ( Threatening phone call to Rajendra Gaikwad ) आला आहे.

शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड( Shiv Sena rebel MLA Sanjay Rathore ) यांची एका वादग्रस्त प्रकरणाची सीडी ( Sanjay Rathore CD ) आपल्याकडे आहे, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड ( Shiv Sena district chief Rajendra Gaikwad ) यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. याच सीडी प्रकरणामुळे आमदार राठोड यांच्या एका समर्थकाचा जळपळाट झाला आहे. आमि त्याने थेट शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांना धनकी दिली आहे. सतीश नाईक असे राठोड समर्थकाचे नाव आहे.

त्याने थेट औरंगाबाद येथून फोन करून आमदार संजय राठोड हे शिवसेनेच्या नाही तर बंजारा समाजाच्या मतांमुळे निवडून येत असल्याचा दावा केला आहे. त्त्यावर त्याला गायकवाड यांनी कडक शब्दात उत्तर देत यवतमाळ येथे चर्चेसाठी येण्याचे आव्हान दिले आहे. या संदर्भात झालेल्या संभाषणाची ऑडीओ क्लिपदेखील चांगलीच व्हायरल झाली आहे.

सध्या राज्यात नव्या सत्तांतराचे वारे (bjp forming a new government ) वाहत आहेत. यात सेनेच्या बंडखोर आमदारांचा मोठा वाटा आहे. त्यामुळे संजय राठोड यांचे सीडी प्रकरण बाहेर येत आहे. विविध कारणावरून बंडखोर आमदारांना व त्यांच्या कुटुंबीयांना त्रास दिला जातोय.

हेही वाचा -BJP Will Claim Power: भाजप करणार सत्तेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details