औरंगाबाद - निवृत्त अधिकाऱ्याला दुपारी दार उघडे ठेवून आराम करणे चांगलेच महाग पडले आहे. बॅगमध्ये असलेले ५ लाखांचे दागिने एका महिलेने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्ग प्रकल्प कार्यालय जालना येथून सेवानिवृत्त झाले आहेत. एन २ सदाशिवनगर येथे शुक्रवारी 11 जून रोजी दुपारी तीनच्या सुमारास रमेश तायडे घराचा दरवाजा उघडा ठेवून आराम करत होते. त्यावेळेस एका महिलेने घरात घुसुन दागिने चोरून नेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तायडे झोपेतून उठल्यावर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिल्यानंतर पोलिस निरीक्षक शरद इंगळे यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. हा तपास पोलीस निरीक्षक अमोल म्हस्के यांच्याकडे दिला.
हेही वाचा-हुश्श!मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट कमी होऊन ४.४० टक्के!