औरंगाबाद - घरी कोणी नसल्याची संधी साधत पडेगाव येथील पोलीस कॉलनीत चोरट्यांनी तीन तोळे सोन्यावर डल्ला मारला आहे. याप्रकारणी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
पडेगाव येथील पोलीस कॉलनीत दार तोडून तीन तोळे सोने लंपास - padegaon aurangabad
औरंगाबाद शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. पाडेगाव भागात ३४ ग्राम सोन्याचे दागिने लंपास केले.याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार
पडेगाव पोलीस कॉलनी येथील रहिवासी किरण अरुण तवरे मार्केटिंग अधिकारी आहेत. त्यांची पत्नी शाळेत लेखापाल आहेत. किरण हे शुक्रवारी (ता. १२) सकाळी कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी कामानिमित्त शाळेत गेली होती. पती घरी नसल्यामुळे किरण यांच्या पत्नी प्रतापनगर येथील घरी तीन दिवस मुक्कामी होत्या. बाहेरगावचे काम आटपून किरण हे पत्नीसोबत घरी आले. यावेळी त्यांना गेटचे कुलूप आणि घराच्या लाकडी दाराचा कडीकोयंडा तुटलेला दिसला. वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटातील सर्व साहित्य खाली फेकलेले आणि त्यातील सोन्याचे दागिने, किंमती घड्याळ चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
दागिने - घड्याळाची चोरी
पोलीस कॉलनीतील मार्केटिंग अधिकाऱ्याच्या घरातून ८ ग्रॅमचे कानातील २ झुंबर, १७ ग्रॅमचे सोन्याचे वेढण, पाच ग्रॅमच्या सोन्याच्या ४ रिंग, २ ग्रॅमचा दागिणा, ७ ग्रॅमची अंगठी असे एकूण ३४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि किंमती घड्याळ चोरट्यांनी लंपास केले.