महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मेहबूब शेख यांच्या विरोधात 'ती' तक्रार चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून? - सुरेश धस

राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या माहिलेने काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटी तक्रार देत गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तीने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

न

By

Published : Jun 19, 2022, 7:13 AM IST

औरंगाबाद- राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात तक्रार देणाऱ्या माहिलेने काही दिवसांपूर्वी अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेल्या तरुणीने भाजपच्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यानुसार खोटी तक्रार देत गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे. इतकेच नाही तीने जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे.

जिन्सी पोलिसात तक्रार -नदमोद्दीन शेख यांनी लग्नाचे आमिष दाखवून सिडको भागात अत्याचार करून माझा व्हिडिओ तयार केला आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत, मी जसे सांगेन तसे केल्यास आपण खूप पैसे कमवू, असे सांगितले. त्यानंतर सुरुवातीला नाशिक येथील मेहबूब शेख यांच्याविरोधात खोटी तक्रार दाखल करायला लावली. मात्र, पोलिसांना तक्रार खोटी असल्याचा संशय आल्याने त्यांनी गुन्हा दाखल केला नाही. नदमोद्दीन शेख याच्या सांगण्यानुसार औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख विरोधात खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल केल्याचे तरुणीने आपल्या अर्जात म्हटले आहे.

चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून तक्रार -युवतीने आपल्या तक्रारीत भाजप नेत्या चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या नावाचा उल्लेख करत आरोप केले आहेत. सुरेश धस यांच्या सांगण्यावरून नदमोद्दीन शेख यांनी मला मेहबूब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितले, असा आरोप युवतीने केला आहे. गुन्हा दाखल होतच भाजप नेत्या चित्रा वाघ यांना तर मला यात पडायचे नसल्याचे सांगितले. आता तक्रार मागे घेतली तर तुलाच जेलमध्ये जावे लागेल, अशी धमकी त्यांनी दिली. तसेच माध्यमांना काय बोलायचे त्याबाबत व्हिडिओ तयार करून पाठवला, असही युवतीने आपल्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

नोव्हेंबर महिन्यात दिली होती तक्रार -राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात 29 वर्षीय शिक्षिकेने मुंबईला कामासाठी नेत असताना काम करून देण्याच्या बहाण्याने 14 नोव्हेंबर रोजी मुंबईला जाण्याचे कारण सांगत, जालना रोडवरील हॉटेल रामगिरी समोर बोलावले. तेथून मेहबूब यांनी कारच्या मागील सीटवर बसवून वसंतराव नाईक कॉलेजजवळ निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर मावशीने धीर दिल्याचे सांगत तिने सिडको पोलीस ठाण्यात मेहबूब शेख यांच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांनी मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा -Raghunath Kuchik case : पोलिसांना दिलेली तक्रार मागे घेणार - पीडित तरुणी

ABOUT THE AUTHOR

...view details