औरंगाबाद -राज्य सरकारने अजून अतिवृष्टीचा अहवाल केंद्राकडे पाठवलेला नाही. अहवाल जो पर्यंत पाठवणार नाही, तोपर्यंत केंद्र मदत जाहीर करू शकत नाही, असा खुलासा केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिली.
विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा -
देशाचे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. यावेळेस दक्षिणेकडे जमीन घेतली तर विमानतळाचा विस्तार लवकर होईल, असे त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यावर सकारात्मक निर्णय होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे कराड यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड पीक विम्याचा हप्ता राज्याने दिला नाही - पीक विमाबाबत अडचणी आहेत, मात्र राज्य सरकारने पिक विमाबाबतचा त्यांचा हप्ता अजून दिला नाही. त्यामुळे केंद्र सरकार पैसे टाकू शकत नाही. जेवढा वाटा राज्य सरकार भरणार तेवढाच वाटा केंद्र सरकार भरणार, ही प्रक्रिया सुद्धा राज्य सरकार लवकर करेल. याबाबत लवकरच बैठक घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितले. तर औरंगाबादच्या घरकुल योजनेबाबत कराड यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली यातूनही मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
हे ही वाचा -'खोटं बोलणाऱ्यांना बाळासाहेबांनी शिवसेनेतून काढलं'; उद्धव ठाकरेंची टोलेबाजी