औरंगाबाद - राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल शुक्रवारी लावण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार दुपारी एक वाजता निकाल लागला. मात्र, ऑनलाइन पद्धतीने लागलेला निकाल वेबसाईट हँग झाल्याने विद्यार्थ्यांना पाहताच आला नाही. त्यामुळे आपला निकाल पाहण्यासाठी उत्सुक असलेले विद्यार्थी निराश झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
औरंगाबाद येथील वंदे मातरम शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांसह संस्थेचे सचिव वाल्मीक सुरवसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी 'सकाळपासून विद्यार्थी उत्सुक'
दहावीचा निकाल लागणार यामुळे विद्यार्थी उत्सुक होते. दुपारी एक वाजता निकाल लागणार असल्याचे सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आपल्याला किती टक्के पडतील, काय होईल याबाबत एक धाकधूक होती. एक वाजला आणि विद्यार्थ्यांनी मोबाईलवर आपला निकाल पाहण्यास सुरुवात केली. मात्र, कितीहीवेळा वेबसाईट ओपन करण्याचा प्रयत्न केला. मात्र वेबसाईट काही ओपन झाली नाही. संबंधीत वेब साईट पुर्णपणे हँग झाली असल्याचे समोर आले आणि मोठ्या उत्सुकतेने निकाल पाहायचा होता, त्याने मोठी निराशा केली. दरम्यान, सरकारने तत्काळ वेबसाईट दुरुस्त करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
'शाळांनी केली विद्यार्थ्यांच्या अभिनंदनाची तयारी'
दहावीचा निकाल लागणार म्हणून शाळा प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळेत व्यवस्था करण्यात आली. विद्यार्थी निकाल पाहून आनंदाने येतील असे वाटत असताना, विद्यार्थी निकाल मिळत नाही म्हणून तक्रार करत आले, अशी माहिती वंदे मातरम संस्थचे वाल्मीक सुरवसे यांनी दिली.