औरंगाबाद -शहरातीलसंत तुकोबा नगर एन २ येथे निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली आहे. येथील मौलाना आझाद कॉलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (वय 52) असे हत्या झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. दरम्यान, पोलीस आयुक्त घटनास्थळी दाखल झाले असून, घरातील सदस्यासह निकटवर्तियांची चौकशी सुरु आहे.
घरात घसून अज्ञात व्यक्तीने केली हत्या -
प्रख्यात मौलाना आझाद महाविद्यालयातील प्राध्यापकाचा राहत्या घरात गळा चिरून निर्घृण खून झाल्याची खळबळजनक घटना आज उघडकीस आली. ही घटना सिडको एन 2 भागात आज पहाटे उघडकीस आली. डॉ. राजन शिंदे असे खून झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. ते मौलाना आझाद कॉलेजमधील इंग्रजीचे प्राध्यापक होते. रविवार दी.10 रोजी चोपड्याच्य महाविद्यालयाच्या प्राध्यापकासोबत जेवण केली आणि जेवण करून ते घरी आले होते. दरम्यान घरात पत्नी, आई, वडील, मुलगा, मुलगी होते. घराच्या हॉलमध्ये मध्यरात्री राजन याची गळा, दोन्ही हात, एक कान चिरून अज्ञात व्यक्तीने त्याचा खून केला. दरम्यान पहाटेच्या सुमारास ही बाब उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खुनाचा तपास गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. दुपारपर्यंत हत्येचे कारणसमोर आले नव्हते. अज्ञात आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.