औरंगाबाद - गरज पडल्यास ॲम्बुलन्स बोलण्यासाठी 108 हा टोल फ्री क्रमांक शासनाने जारी केला आहे. तसेच, रक्ताची तातडीची गरज पडल्यास मदत मिळावी म्हणून (104)हा क्रमांक नागरिकांच्या मदतीसाठी चालू करण्यात आला होता. मात्र, ही सेवा एक एप्रिलपासून संपुष्टात आल्याने सर्वसामान्य रुग्णांना आता रक्तासाठी वणवण फिरण्याची वेळ येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Blood Supply '104' Service Closed) दरम्यान, याबाबतचे काय परिणाम होतील याबाबत आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी घाटी रुग्णालयातील रक्तपेढी येथे कार्यरत असलेले हनुमान रुळे यांच्याशी बातचीत केली आहे.
रक्त मिळवण्यासाठी हेल्पलाईन -गोर गरिबांना उपचार घेताना मोफत रक्त मिळावे यासाठी शासकीय रक्तपेढीमध्ये रक्तसंकलन केले जाते. (104)क्रमांकावर रक्ताची मागणी केली गेल्यास ब्लड ऑन कॉल योजनेअंतर्गत चाळीस किलोमीटर परिसरात खाजगी किंवा रुग्णालयात मोफत रक्त पुरवले जाते. (The 104 blood supply service Closed) शासकीय रक्त केंद्राचे बळकटीकरण करण्यासाठी व गरजूंना रुग्णांना वेळेवर रक्त मिळावे यासाठी धावाधाव करण्याची गरज पडू नये, यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत योजना सुरू होती.
रुग्णाचे आरोग्य अडचणीत येण्याची भीती - राज्य रक्तसंक्रमण परिषदेच्या माध्यमातून राज्यभरातील शासकीय रक्त केंद्रांमध्ये (ऑक्टोबर 2013)साली ब्लड ऑन कॉल म्हणजेच जीवन अमृत सेवा रुग्णहिताची अभिनव योजना सुरू करण्यात आली होती. मात्र, हीच योजना (1 एप्रिल)पासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त पाठवणे शक्य होणार नाही. गरजू लोकांच्या नातेवाईकांना रक्त पेढी पर्यंत येऊन रक्त घेऊन जावं लागणार आहे. त्यात जाणाऱ्या वेळामुळे रुग्णाचे आरोग्य अडचणीत येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नियुक्त कर्मचाऱ्यांची जाणार नोकरी -जीवन अमृत सेवा या योजनेअंतर्गत रुग्णांना रक्त पुरवणे त्याच बरोबर रक्त संकलनाचे काम करण्यासाठी काही लोकांची नियुक्ती करण्यात आली होती. शासकीय रक्त केंद्रामध्ये अत्यंत अल्प वेतनावर एक रक्त संक्रमण अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक आणि तंत्रज्ञ अशा तीन जणांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या कर्मचार्यांच्या नियुक्त्यांमुळे सर्व शासकीय रक्त केंद्राला मोठा हातभार मिळाला होता.