महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Test Lab For Genome Sequencing : जीनोम सिक्वेंसिंगसाठी टेस्ट लॅब विद्यापीठात शक्य, चार कोटींची होणार बचत - जिल्हाधिकारी - Omicron Patients in Aurangabad

ओमायक्रॉन ( Omicron Variant ) या विषाणूच्या निदानासाठी आवश्यक जीनोम सिक्वेंसिंगसाठी ( Genome sequencing ) लागणारे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ( Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ) लॅबमध्ये ( Test Lab For Genome Sequencing ) उपलब्ध असल्याने शहरातच ओमायक्रॉन चाचणी करणे शक्य होणार आहे. त्याबाबत लॅबची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ( Aurangabad District Collector Sunil Chavan ) यांनी समिती स्थापन केली आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालय

By

Published : Dec 25, 2021, 7:32 PM IST

औरंगाबाद- कोरोनाच्या ओमायक्रॉन ( Omicron Variant) या विषाणूच्या निदानासाठी आवश्यक जीनोम सिक्वेंसिंगसाठी ( Genome sequencing ) लागणारे सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ( Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University ) लॅबमध्ये उपलब्ध असल्याने शहरातच ओमायक्रॉन चाचणी करणे शक्य होणार आहे. त्याबाबत लॅबची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ( Aurangabad District Collector Sunil Chavan ) यांनी समिती स्थापन केली आहे. समितीच्या अहवालानंतर जागा निश्चिती झाल्यावर जीनोम सिक्वेंसिंग लॅबचा प्रस्ताव शासनास सादर केला जाईल. विद्यापीठातील लॅबमध्येच ( Test Lab For Genome Sequencing ) ओमायक्रॉनच्या चाचण्या केल्या तर सुमारे 4 कोटी रुपये वाचणार आहेत. तसेच तपासणीसाठी लागणार वेळ वाचणार आहे, असेही जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.

प्रयोगशाळेसाठी प्रशासन प्रयत्नशील...

ओमायक्रॉन विषाणू निदानामध्ये जीनोम सिक्वेंसिंग तपासणी औरंगाबादेत व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली. जीनोम सिक्वेंसिंग तपासणी केंद्राचे ठिकाण निवडीसाठी जिल्हा प्रशासनाने एक समिती स्थापन केली आहे. घाटी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील 'पॉल हर्बर्ट सेंटर फॉर डीएनए बारकोडिंग अँड बायोडायव्हर्सिटी स्टडीज'ची कोरोना चाचणी प्रयोगशाळा या दोन्ही ठिकाणाची पाहणी समिती करणार आहे. घाटीच्या अधिष्ठाता डॉ. वर्षा रोटे, विद्यापीठातील डॉ. गुलाब खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांचा समितीत समावेश आहे. ही समिती घाटी तसेच विद्यापीठ येथील प्रयोगशाळेची पाहणी करून अहवाल सादर करणार आहे. जागा निश्चिती झाल्यावर जीनोम सिक्वेंसिंग लॅबचा प्रस्ताव शासनास सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली.

चार कोटींचा वाचेल खर्च...

विद्यापीठातील लॅबमध्ये इल्युमिनीया मिसेक सिस्टीम, नेक्स्टसेक 500, बेसस्पेस ऑन साईट सिक्वेंसिंग हब, टेप स्टेशन, क्यू-बीट डीएनए अॅण्ड आरएनए अनालयझर, अशी 4 कोटी रुपयांची यंत्रसामग्री आहे. दरम्यान, जीनोम सिक्वेंसिंग तपासणी प्रक्रिया सर्व रोगांसाठी लागत नाही. चाचणीसाठी 18 लाख किट लागणार ( Kits Will Be Required For Testing ) आहेत. घाटीत यंत्रणासाठी उभारणीसाठी किती खर्च लागेल व विद्यापीठातील लॅबमध्ये काय उपलब्ध आहे, त्यानुसार समितीने निर्णय घेईल. त्यानंतर प्रधान सचिवांना कळवून लॅब सुरू करण्याचा निर्णय होईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

शहरात आढळले दोन ओमायक्रॉनग्रस्त रुग्ण

औरंगाबाद शहरात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळून ( Omicron Patients in Aurangabad ) आल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी पारस मंडलेचा यांनी दिली आहे. दोन्ही रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.

हे ही वाचा -Omicron in Aurangabad : औरंगाबादेत ओमीक्रॉनचा शिरकाव, दोन जण पॉझिटीव्ह

ABOUT THE AUTHOR

...view details