औरंगाबाद - औरंगाबाद आणि मराठवाडा लक्ष करून अनेक युवकांना दहशतवादी संघटनांना Terrorist organizations in Marathwada जोडण्याचे काम केले जाण्याची शक्यता आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर PFI in Marathwada बंदी घालण्यात आली आहे. मात्र अशा अनेक संघटना कार्यरत असण्याची भीती आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केली आहे.
मराठवाडा केलं जातय लक्ष -दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या संघटनांना तीन प्रामुख गोष्टींची लक्ष असते, ते म्हणजे मनुष्यबळ, पैसा आणि प्रसारक. या तिन्ही गोष्टी मराठवाड्यात पोषक असल्याने या भागाला लक्ष केले जात असल्याचं अभ्यासक लेफ्टनंट करणार डॉ. सतीश ढगे यांनी सांगितलं. मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुस्लिम धर्मियांची संख्या अधिक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी पूर्वी काही घडलेल्या घटनांचा आधार घेऊन युवकांना चुकीच्या पद्धतीने वळवण सोप आहे. याचाच फायदा दहशतवादी संघटनांची निगडित असलेल्या सोशल फंड घेतात आणि त्यामुळे या ठिकाणी स्लीपर सेल सारख्या गोष्टी सहज शक्य होऊ शकतात. त्याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतो आहे. असं प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा लेफ्टनंट कर्नल डॉ. सतीश ढगे यांनी सांगितलं.
मराठवाड्यातील दहशतवादी संघटनांच्या सक्रियतेविषयी माहिती देताना डॉ. सतीश ढगे औरंगाबादमध्ये घडल्या होत्या काही घटना-औरंगाबाद मध्ये पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेची निगडित काही जणांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी 14 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यापैकी दहा जणांना चौकशी करून सोडण्यात आलं तर, चार जणांना स्थानबद्ध करण्यात आलं. मात्र अशा पद्धतीची कारवाई होण्याची ही पहिली वेळ नाही. तीन वर्षा आधी याच संघटनेची निगडित असलेल्या काही जणांना कारवाई करण्यात आली होती. दहशतवादी संघटनाच्या निगडित औरंगाबाद मध्ये काही घटना घडल्या आहेत. यामध्ये 2006 मध्ये वेरूळ येथे शस्त्रसाठा आढळून आला होता. तर त्यानंतर 2013 मध्ये दहशतवाद्यांना पकडताना एटीएसने एन्काऊंटर करत कारवाई केली होती. काळात या सर्व घटनांकडे पाहता औरंगाबाद मध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी कारवाईशी संबंधित घटना होत असल्याचं दिसून आलं. आणि ही बाब चिंतेची आहे. अशी माहिती लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे यांनी दिली.
सोशल मीडियाचा केला जातो मोठ्या प्रमाणात वापर -युवकांना दहशतवादी कारवाईसी जोडण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. विशेषतः जगात घडलेल्या काही घटनांना एडिट करून युवकांना चुकीची माहिती पुरवण्यात येते. मुस्लिम धर्मियांवर किती अन्याय अत्याचार केला जातो हे पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. वारंवार अशा पद्धतीने सोशल मीडियावर व्हिडिओ किंवा माहिती प्रसारित करून युवकांच्या मनात द्वेष निर्माण होऊन, ते दहशतवादी संघटनांशी कसे जोडले जातील यासाठी प्रयत्न केले जातात. त्यामुळे सोशल मीडियावर काही निर्बंध असणे किंवा त्याची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे. यासाठी युवकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.
मदरशांची संख्या अधिक -मराठवाड्यात मदरशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यात औरंगाबाद मध्ये ही संख्या अधिक मानली जाते. काही मदरशांमध्ये आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब केला गेला आहे. मात्र आजही काही मदरशांमध्ये धार्मिक शिक्षण चुकीच्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच जातीय तेढ निर्माण करून हिंसक कारवायांमध्ये, संघटित गुन्हेगारी करण्यासाठी त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी पैसे पुरवले जातात. अशावेळी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया सारख्या या संघटना मदत करतात. ही बाब भविष्यात अधिक धोक्याची असल्याचं मत लेफ्टनंट कर्नल डॉक्टर सतीश ढगे यांनी व्यक्त केली.
अन्य धर्मांंधांचाही धोका -औरंगाबाद जिल्ह्यात दहशतवादी कारवांशी असलेले अनेक पुरावे आजपर्यंत समोर आले. यामध्ये एटीएस आणि इतर तपास यंत्रणांकडून होणारी कारवाई चर्चेचा विषय राहिल्या आहेत. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाईने पुन्हा एकदा नव्या चर्चा सुरू झाल्या असल्या तरी, मुस्लिम दहशतवाद बरोबर अन्य धर्मांध देखील मोठ्या प्रमाणात फळी उभारण्याची शक्यता निर्माण होत आहे. विशेषतः दाभोळकर यांच्या हत्येची पाळमुळ औरंगाबाद पासून जोडली गेली. त्यामुळे येणारा काळामध्ये देशाला वाचवण्यासाठी सर्व धर्मांध दहशतवाद्यांशी मुकाबला करावा लागणार आहे. त्यासाठी सोशल मीडियावर नियंत्रण असणे, पोलिसांनी वेगळ्या पद्धतीने काम करण्याची, त्याचबरोबर जनतेने देखील सतर्क राहून पोलिसांची योग्य संवाद साधने हे देखील तितकच महत्त्वाचे ठरेल असं मत आंतरराष्ट्रीय अभ्यासक लेफ्टनंट कर्नल डॉ सतीश ढगे यांनी व्यक्त केलं.