महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Home Test Kit : घरीच कोरोना चाचणी करताना घ्या 'ही' काळजी, निकाल 30 टक्केच बरोबर?

सध्या राज्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाची होम टेस्ट किट सध्या बाजारात आहेत. या किट उपयुक्त असल्या तरी त्यावर करण्यात येणाऱ्या चाचणी निकालावर (Corona Test Report) जास्त विश्वास ठेवता येणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अभ्यासक डॉ. सतीश ढगे (Dr. Satish Dhage) यांनी दिली.

home test kit
होम टेस्ट किट

By

Published : Jan 14, 2022, 8:19 PM IST

Updated : Jan 14, 2022, 8:54 PM IST

औरंगाबाद -राज्यात ओमायक्रॉनचा (Omicron Cases) धोका वाढत आहे, त्यात आपली तपासणी करण्यासाठी होम टेस्ट किट बाजारात (Home Test Kit) उपलब्ध झाल्या आहेत. या किट उपयुक्त असल्या तरी त्यावर करण्यात येणाऱ्या चाचणी निकालावर (Corona Test Report) जास्त विश्वास ठेवता येणार नाही, अशी माहिती वैद्यकीय अभ्यासक डॉ. सतीश ढगे (Dr. Satish Dhage) यांनी दिली.

माहिती देताना वैद्यकीय अभ्यासक डॉ. सतीश ढगे
  • RTPCR आणि होम टेस्टमध्ये आहे हा फरक -

सर्दी, ताप, घशात खरखर अशी लक्षणे दिसली की कोरोना चाचणी केली जाते. यामध्ये RTPCR चाचणीचा निकाल शंभर टक्के बरोबर असतो. यामध्ये तपासणीसाठी असलेली नळी नाकाच्या शेवटच्या टोकापर्यंत आत ढकलली जाते आणि तिथून नमुना घेऊन त्याची चाचणी केली जाते. त्यामुळे त्याच्यात आलेला निकाल अगदी बरोबर असतो. मात्र, होम किटमध्ये नागपुडीमध्ये नळी टाकली जाते आणि तेथील नमुन्यावर तपासणी केली जाते. त्यामुळे केलेली तपासणी निकाल 30 ते 40 टक्केच बरोबर असल्याची शक्यता असते, अशी माहिती वैद्यकीय अभ्यासक डॉ. सतीश ढगे यांनी दिली.

  • अशी वापरावी होम किट -

बाजारात मिळणारे कोरोना चाचणी होम किट वापरण्यासाठी विशेष अशी काळजी घ्यावी लागते. विशेषतः कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढल्यास, या किटची गरज भासणार आहे. सर्वात पहिले औषधी दुकानातून होम किट घेतल्यावर, दुकानदाराने त्याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. किट वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते, किट बाहेर काढल्यानंतर सर्वात आधी निर्जंतुकीकरण केलेल्या जागेवर तिला ठेवणे गरजेचे असते. त्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये त्याचं एक ॲप डाउनलोड करून ठेवावं लागते. नाकातून घेतलेला नमुना त्या किटवर ठेवताच, काही वेळात त्याची नोंद मोबाईलमध्ये दिसून येते आणि आपला अहवाल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे आपल्याला तातडीने समजून येते. त्यानंतर किटचा वापर झाल्यावर ती तातडीने नष्ट करण्याची खबरदारी घ्यावी लागते. या किटचा उपयोग असला तरी डॉक्टरांचा सल्ला देखील तितकाच महत्त्वाचा असल्याचे मत डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.

  • सरकार दरबारी होम किटबाबत नोंद नाही -

आपल्या आरोग्याची काळजी घेत असताना, आपण होम किटच्या साह्याने घरीच कोरोनाची बाधा झाली आहे का नाही हे तपासू शकतो. त्याबाबत होम किट बाजारात सहज उपलब्ध आहेत. मात्र या किटवर झालेल्या नोंदी नंतर किती जणांना बाधा झाली आहे, याची आकडेवारी मात्र शासनाकडे उपलब्ध होत नाही. त्यामुळे हा देखील पुढील काळातला धोका ठरू शकतो, असे मत अभ्यासकांनी व्यक्त केले. या किटच्या माध्यमातून बाधित झालेल्या लोकांची माहिती प्रशासनाला मिळाली तर त्यापासून पुढील होणारी बाधा टाळणे शक्य होते. त्याबाबतची यंत्रणा ही सज्ज करायला हवी, असे मत डॉ. सतीश ढगे यांनी व्यक्त केले.

Last Updated : Jan 14, 2022, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details