औरंगाबाद - शहरातील एका शाळेतून एकाचवेळी 32 जणांना कामावरून कमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली. कुठलीही पूर्वसूचना न देता कामावरून कढल्याने शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी रोष व्यक्त केला. शिक्षकांनी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या करत शाळा प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
चिकलठाणा एमआयडीसी परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद अकादमी शाळेत मराठी माध्यमाचे प्रवेश होत नाहीत, असे कारण देत 32 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तचे पत्र देऊन काढून टाकण्यात आले. मात्र, संस्थेने विद्यार्थी कमी झाल्याने अतिरिक्त होत असलेल्याना हे पत्र देऊन सेवा समाप्त केल्याचे कळवले आहे.
कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे अनेक शाळांनी आपल्याकडे काम करणाऱ्या शिक्षकांचे आणि इतर कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केल्याचे पाहायला मिळाले. त्यात औरंगाबादच्या विवेकानंद अकादमी शाळेत मराठी माध्यमाचे प्रवेश होत नाहीत, असे कारण देत 32 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तचे पत्र दिले आहे. त्यामध्ये काही शिक्षक हे 20 वर्षांपासून कार्यरत आहेत, तर काही कर्मचारी वयाच्या पन्नाशीच्या पुढे आहेत. खरंतर शाळेने यापरिस्थिती बाबत पूर्व कल्पना द्यायला हवी होती. कामावरून कमी करत असताना किमान तीन महिने आधी नोटीस देणे गरजेचे आहे. मात्र, तसे न करता शाळेने नियमित कामावर आल्यावर अचानक 32 जणांना कामावरून कमी केल्याचं सांगण्यात आले. यामुळे शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनी कारवाईचा निषेध करत मुख्य प्रवेश मार्गावर ठिय्या केला.
विवेकानंद शाळेने एकाच वेळी 32 जणांना केले कामावरून कमी - aurangabad swami vivekananda academy news
आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहोत. कोरोनाचा काळात नोकरीवरून काढू नका, असे मुख्यमंत्री संगतायेत. मग आमच्यावर अन्याय का? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला. आधी तरी कल्पना दिली असती तर आम्ही दुसरीकडे सोय केली असती. पण आज काहीजण वयाच्या पन्नाशीत आहेत. त्यांना कोण काम देणार? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.
आम्ही प्रामाणिकपणे काम करतो आहोत. कोरोनाचा काळ नोकरीवरून काढू नका असे मुख्यमंत्री संगतायेत, मग आमच्यावर अन्याय का? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला. आधी तरी कल्पना दिली असती तर आम्ही दुसरीकडे सोय केली असती. पण आज काहीजण वयाच्या पन्नाशीत आहेत. त्यांना कोण काम देणार असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला.
याप्रकरणी संस्थेने मात्र जिल्हा परिषदच्या नियमांकडे बोट दाखवले आहे. संस्थेने विद्यार्थी कमी झाल्याने अतिरिक्त होत असलेल्याना हे पत्र देऊन सेवा समाप्त केल्याचे शाळेचे प्रशासक सत्यनारायण जयस्वाल यांनी सांगितले.