महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या, एकटी आई करायची मुलीचा सांभाळ - तरुणीची आत्महत्या

आई हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये जाताच मनीषा फ्लॅटच्या बाहेर आली. दरवाजा बाहेरून बंद करुन घेतला आणि ती गच्चीवर गेली. कुणाला काही कळण्याच्या आत मनीषाने बिल्डिंगवरुन खाली उडी घेतली. मनीषा डोके व छातीवरच कोसळल्याने गंभीर जखमी झाली. मनीषाने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Suicide of a young woman by jumping from the fifth floor
पाचव्या मजल्यावरून उडी मारून तरुणीची आत्महत्या

By

Published : Mar 28, 2021, 10:09 AM IST

औरंगाबाद - कौटुंबिक वादामुळे विभाक्त झालेल्या आई-वडीलांच्या १९ वर्षीय मुलीने बिल्डिंगच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. बीड बायपासवरील दिशानगरीत ही घटना घडली. गंभीर जखमी अवस्थेत तरुणीचा उचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

न्यायालयात सुरू असलेल्या कौटुंबिक प्रकरणाच्या तारखेला हजेरी लावून आई व मुलगी शुक्रवारी दुपारी घरी परतल्या. आई हातपाय धुण्यासाठी बाथरुममध्ये असताना मुलीने पाचव्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला.

काय आहे प्रकरण

मनीषा भगवान शेळके (१९) असे मृत तरुणीचे नाव आहे. मनीषाच्या जन्मानंतर दोन वर्षांनी तिचे आई-वडील विभक्त झाले. पतीपासून विभक्त झालेल्या मनीषाच्या आईने एकुलती एक मनीषाला वाढवले. मनीषाला एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षात प्रवेश मिळाल्याने तिच्या आईने सिडकोतील गुलमोहर कॉलनीतून बीड बायपासला स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला. आई-वडील विभक्त झाल्याने त्यांचा कौटुंबिक न्यायालयात खटला सुरु आहे. मनीषाचे वडील भगवान शेळके कुठल्याच तारखेला हजर राहिले नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरोधात वॉरंटदेखील काढले. शुक्रवारी तारीख असल्यामुळे मनीषा व तिची आई न्यायालयात गेल्या होत्या. मात्र, वडील हजर राहिले नाहीत. त्यामुळे चार वाजता दोघी न्यायालयातून घरी परतल्या.

मृत्यूचे कारण अस्पष्ट

न्यायालयातून घरी आल्यानंतर मनीषाची आई हातपाय धुण्यासाठी बाथरूममध्ये जाताच मनीषा फ्लॅटच्या बाहेर आली. दरवाजा बाहेरून बंद करुन घेतला आणि ती गच्चीवर गेली. कुणाला काही कळण्याच्या आत मनीषाने बिल्डिंगवरुन खाली उडी घेतली. मनीषा डोके व छातीवरच कोसळल्याने गंभीर जखमी झाली. काही तरी पडल्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील रहिवासी गोळा झाले. त्यांनी मनीषाला खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी घाटीत हलवण्यास सांगितले. घाटीत दाखल केल्यानंतर रात्री नऊ वाजता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनीषाने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details