औरंगाबाद - माझ्या आत्महत्येस मी जबाबदार आहे. आई बाबा बाय, अशी चिठ्ठी लिहून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तरुणाला मृत घोषित केले.
हेही वाचा-प्रेयसीच्या वडिलांनी तलवार दाखवून धमकावल्याने २५ वर्षीय प्रियकराची आत्महत्या
सागर महेंद्र कुलकर्णी (वय 21 रा.ज्योती प्राइड सातारा परिसर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. लातूर येथे तो तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होता. लॉकडाऊन लागू झाल्यापासून तो शहरात आला होता. त्याचे ऑनलाईन वर्ग सुरू होते. गेल्या वर्षभरापासून सागराला स्किझो फ्रेनिया हा आजार होता. त्याच्यावर बराळे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान मंगळवारी सकाळी चहानंतर गोळ्या दिल्या. त्यानंतर चाळीस दिवसांनंतर परीक्षा आहे. तुम्ही काळजी करू नका, मी परीक्षेची तयारी करतो असे तो वडिल कामावर जाताना त्यांना बोलला. सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरात पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतला. दरम्यान ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी सागराला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
हेही वाचा-विधवा शिक्षिकेसोबतची मैत्री भोवली, ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरूणाची आत्महत्या