औरंगाबाद- लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका सलून चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भोईवाडा येथे घडली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आर्थिक अडचणीमुळे तरुणाची आत्महत्या
औरंगाबाद- लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या एका सलून चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भोईवाडा येथे घडली आहे. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आर्थिक अडचणीमुळे तरुणाची आत्महत्या
विलास उत्तम ठाकरे (वय 35 रा. कैलासनगर ) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या सलून चालकाचे नाव आहे. मागील पंधरा वर्षापासून विलास ठाकरे यांचे भोईवाड्यात सलून दुकान आहे. या सलून व्यवसायातून ठाकरे कुटुंबीयांचे घर खर्च भागत असे. मात्र गेल्या वर्ष-दीड वर्षापासून व्यवसाय बंद असल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. यातच पुन्हा एकदा लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती आणखी खालावली. दरम्यान, विलास यांनी बुधवारी दुकानात येत असल्याचे काही मित्रांना सांगितले. विलास दुकानात येत असल्यामुळे त्याचे मित्र देखील त्या ठिकाणी आले. मात्र शटर अर्धवट उघडे असल्याने मित्रांनी दुकान उघडे केले. तोपर्यंत विलासने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मित्रांनी विलासला घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा -महाराष्ट्रासह कर्नाटक, केरळला बसणार चक्रीवादळाचा तडाखा
हेही वाचा -'ब्रेक दि चेन' अंतर्गत राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले