महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aurangabad Crime - भोळसर मुलाला भिकेला लावून सावत्र बापाने जिवंतपणी घातला दिवस - निधन झालेल्या मुलाला लावले भिकेला

सावत्र बापाने मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगत त्याला भीक मागायला (stepfather forced his child for begging) लावले. नंतर त्याचे मित्रांना हा मुलगा भीक मागताना दिसला. मित्रांच्या मदतीने त्याला पुन्हा पालकांकडे सोडण्यात आले.

Aurangabad Crime
Aurangabad Crime

By

Published : Dec 18, 2021, 10:47 AM IST

औरंगाबाद - 16 वर्षीय भोळसर मुलाचे कोरोनाने निधन झाल्याचा बनाव केला. आपल्याच सावत्र बापाने मुलाला भीक मागायला लावल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद येथे समोर आला आहे. हा मुलगा चक्क घाटी रुग्णालयाजवळ भीक मागत होता. मित्रांच्या मदतीने त्याला पुन्हा पालकांकडे सोडण्यात आले.

बापाने जिवंतपणी घातला दिवस
असा घडला प्रकार
रांजणगाव शिवारातील राहणाऱ्या विवाहित महिलेने पतीच्या निधनानंतर दुसरा विवाह केला. पहिल्या पतीपासून असणारा भोळसर मुलागा सावत्र बापाला नकोसा झाल्याने, त्याने षडयंत्र रचले. तीन महिन्यांपूर्वी त्याने भोळसर मुलाला ताप आला म्हणून, कोरोना तपासणी करण्यासाठी घाटी रुग्णालयात घेऊन जात असल्याचे भासवले. मुलाचे वडिल काही वेळाने एकटेच घरी आले. आणि आपल्या मुलाला कोरोना झाला असून, तो घाटी रुग्णालयात उपचार घेत आहे, असे सांगितले. अवघ्या आठ दिवसांनी आपल्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे आणि त्याच्यावर घाटी प्रशासनानेच अंत्यसंस्कार केले अशी माहिती दिली. आणि बायकोसह त्याचा दहावा आणि तेरावाही घातला.



असा उघडकीस आला प्रकार

मुलगा राहत असलेल्या परिसरातील हाफिज शेख, अमोल शेवनकर, शुभम दुसांगे हे कामानिमित्त घाटी रुग्णालयात गेले होते. त्यावेळी त्यांना 16 वर्षीय हा मुलगा भीक मागत असल्याचे दिसले. त्यांनी त्याच्यासोबत बोलून, घरी येण्याबद्दल विनंती केली. मात्र मला घेण्यासाठी आई येत आहे. मी तिची वाट बघत आहे, असे सांगत घरी जाण्यास मुलाने नकार दिला. या बाबत नागरिकांनी मुलाच्या घरी जाऊन तुमचा मुलगा कोरोना मृत झाला नसून तो घाटी परिसरात भीक मागून जगत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. मात्र, आमच्या मुला सारखा दिसणारा दुसराच कोणी मुलगा असेल असे सांगून त्यांनी मुलाला घेऊन येण्यास टाळाटाळ केली.

पोलिसांच्या धाकाने मुलाला आणले परत
आई वडिलांनी मुलाला आणण्यास उदासीनता दाखवल्याने नागरिकांनी एकत्र येऊन, याबाबत पोलिसांना माहिती देऊ अशी धमकी दिली. त्यानंतर मुलाला घाटी परिसरातून आणले गेले. सोबतच्या नागरिकांनी मुलासह बापाला पोलीस ठाण्यात नेले. पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांनी मुलाला यापुढे व्यवस्थित सांभाळण्याची बापाला तंबी दिली आता अशी चूक होणार नाही असा विश्वास नराधम सावत्र पित्याने दिला.
हेही वाचा -Women Doped For Marriage In Thane : लग्नाचे आमिष दाखवत 26 महिलांची अडीच कोटीने फसवणुक करणारा लखोबा अटकेत

ABOUT THE AUTHOR

...view details