महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

State Government Aid To Farmers : मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता मदत जाहीर

अती पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत (heavy rain in Marathwada) राज्य सरकारने मदत जाहीर केली (State Government Aid To Farmers) आहे. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांसाठी 755 कोटींचे अनुदान पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले (farmers suffered due to heavy rain) आहे.

State Government Aid To Farmers
शेतकऱ्यांना राज्य सरकारची मदत

By

Published : Oct 16, 2022, 12:09 PM IST

औरंगाबाद : अती पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत राज्य सरकारने मदतजाहीर केली (State Government Aid To Farmers) आहे. त्यानुसार बाधित शेतकऱ्यांसाठी 755 कोटींचे अनुदान पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आले (farmers suffered due to heavy rain) आहे. यात मराठवाड्यातील शेतकऱ्यांना 597 कोटी 54 लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. दिवाळीपूर्वी हा निधी शेतकऱ्यांना दिला जाईल, असे शासनाकडून सांगण्यात आले आहे.


राज्यात सर्वाधिक नुकसान मराठवाड्यात -मागील दोन ते अडीच महिन्यांपासून मराठवाड्याच्या वेगवेगळ्या भावांमध्ये पावसाचे प्रमाण वाढले (State Government Aid in Marathwada) आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद या सात जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी अति पाऊस, तर काही ठिकाणी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले (heavy rain in Marathwada) आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार 6 लाख 44 हजार 993 शेतकऱ्यांचे 4 लाख 38 हजार 489 हेक्टरवरील पिकांचे नुकसान आले आहे. त्यानुसार भरपाईसाठी मराठवाड्याला 597 कोटी 54 लाख रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले (suffered due to heavy rain in Marathwada) आहे.


अशी मिळणार मदत -मराठवाड्यात दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत दिली जाईल. असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ही मदत पुढीलप्रमाणे :

जिल्हा शेतकरी संख्या नुकसान क्षेत्र मदत
औरंगाबाद 1,641 12,679 हेक्टर 17.50 कोटी
जालना 1,150 678 हेक्टर 97 लाख
परभणी 4,486 2,545 हेक्टर 34 कोटी 61 लाख
हिंगोली 1,34,406 96, 677 हेक्टर 132 कोटी 14 लाख
बीड 160 48.80 हेक्टर 17 लाख
लातूर 30,42,071 21,351 हेक्टर 290 कोटी
उस्मानाबाद 1,46,310 1,12,609 हेक्टर 153 कोटी 25 लाख

ABOUT THE AUTHOR

...view details