महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील 50 हजार शिक्षकांना मोबाईलवर 'स्पोकन इंग्लिश'चे प्रशिक्षण - Dr. Subhash Kamble's reaction

शिक्षकांनाही अधिक चांगल्या प्रकारे इंग्रजी संभाषण करता आले पाहिजे. यासाठी राज्यातील जवळपास पन्नास हजार प्राथमिक शिक्षकांना मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती डॉ. सुभाष कांबळे यांनी दिली.

डॉ. सुभाष कांबळे

By

Published : Nov 25, 2019, 9:33 AM IST

औरंगाबाद -प्रत्येक शाळेतील शिक्षकांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता आले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढावी, तसेच शिक्षकांनाही अधिक चांगल्या प्रकारे इंग्रजी संभाषण करता यावे, यासाठी राज्यातील जवळपास पन्नास हजार प्राथमिक शिक्षकांना मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण देण्यात आले, अशी माहिती प्रादेशिक विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुभाष कांबळे यांनी दिली.

हेही वाचा... जमशेदपूरमध्ये लग्नसमारंभातील जेवणातून 150 जणांना विषबाधा, 10 अत्यवस्थ

ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेमध्ये अजूनही इंग्रजी विषयाचा बाऊ केला जातो. अजूनही गुणवत्तापूर्ण इंग्रजीचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळत नाही. या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगले लिहिता-वाचता यावे, यासाठी सरकार विविध पातळीवरून आपले प्रयोग शिक्षकांपर्यंत पोहोचत आहेत.

हेही वाचा... बिहार : हाजीपूरमध्ये मुथूट फायनान्समधून 55 किलो सोन्याची लूट, 21 कोटी आहे किंमत

त्याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून यावर्षी शिक्षकांना शाळेतच आपल्या मोबाईलवर इंग्रजी विषयाचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यातील जवळपास 50 हजार शिक्षकांना मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने स्पोकन इंग्लिशचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय कसा शिकवावा, याचे नवीन तंत्र त्यांना देण्यात आले आहेत. याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नक्की होणार असल्याची माहिती विद्या प्राधिकरणाचे संचालक डॉ. सुभाष कांबळे यांनी दिली.

हेही वाचा... छत्तीसगड : दंतेवाडामध्ये माओवाद्यांचा मोठा हल्ला, अनेक वाहने पेटवली

ABOUT THE AUTHOR

...view details