औरंगाबाद :राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना मराठवाड्यात मात्र पावसाने पाठ ( In Marathwada, There is no Rain ) फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. जून महिन्यात कमी पाऊस झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर येऊन ठेपले आहे. लवकरच मोठा पाऊस ( Only 25% rainfall ) आला नाही, तर शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत अवघ्या 46% इतक्याच पेरण्या ( Only 46% sow in Marathwada ) मराठवाड्यात झाल्या आहेत. ( Sowing has been delayed due )
जून महिन्यात 25% टक्केच पाऊस :शेतकऱ्यांसाठी जून महिना अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात पाऊस झाला, तर शेतातील पिकांची वाढ चांगली होते. मात्र, जून महिन्यातच पावसाने दडी मारल्याचे चित्र मराठवाड्यात पाहायला मिळाले. मराठवाड्यात आजपर्यंत 25% इतकाच पाऊस पडला आहे. त्यामुळे जून महिनाअखेर औरंगाबाद जिल्ह्यात 45% तर मराठवाड्यात 46% इतक्यात पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. वेळेवर पाऊस झाला, तर पीक तीन ते चार फूट इतके वाढते. मात्र, पिकांना अजून कोंब फुटलेले नाही. जून महिन्यात कपाशी लावली, तर त्याचा उपयोग होतो. मात्र, पाऊस नसल्याने यंदा कपाशीचे पीक न घेण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्याऐवजी मका किंवा इतर पीक घेत आहे. मात्र, अजून उशीर झाल्यास दुबार पेरणी करावी लागेल, अशी माहिती पळशी येथील शेतकरी देवराव काळे यांनी दिली.
वार्षिक सरासरीच्या जिल्हा निहाय पाऊस :औरंगाबाद - 25% टक्के, जालना - 27% टक्के, बीड 30% टक्के, उस्मानाबाद - 20% टक्के, नांदेड - 26%, लातूर - 22% टक्के, परभणी - 21% टक्के, हिंगोली - 24% टक्के इतका पाऊस झाला आहे. पुढील चार दिवसांत मराठवाड्यात पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. मात्र, पावसाला उशीर होत असल्याने पीक धोक्यात आल्याची माहिती पिसादेवी येथील शेतकरी योगेश काळे यांनी दिली.