औरंगाबाद -वैजापूर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीचे दोघांनी अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोमनाथ निघोटे आणि सुदाम निघोटे या दोन आरोपींवर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा... प्रिन्स प्रकरणाचे गूढ वाढले..! नातेवाईकांना भेटण्यास केईएम प्रशासनाकडून मज्जाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी गावात मेंहदीचा कोन खरेदी करण्यासाठी दुपारी दुकानात गेली होती. मात्र, दुकान बंद असल्याने घराकडे परत येत असताना आरोपी सोमनाथ निघोटे, सुदाम निघोटे हे तिच्या पाठीमागून आले. यानंतर त्या दोघांनी तिला बळजबरीने एका बंद खोलीत डांबून तिच्यावर पाशवी अत्याचार केले. यानंतर तिला हा प्रकार कोणाला सांगितल्यास आई-वडिलांचा खून करण्याची धमकी दिली.
हेही वाचा... सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरण: शशी थरुर यांना परदेशात जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी
यानंतर थोड्या वेळाने तेथील जवळचे एक गृहस्थ खोलीकडे आले असता, त्यांनी खोलीचा दरावाजा बाहेरून उघडला. तसेच पिडीत मुलीला तिच्या घरच्यांकडे घेऊन गेले. यानंतर मुलीच्या पित्याने वैजापूर पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रारीवरून उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणीकर यांनी आरोपी सोमनाथ निघोटे आणि अशोक निघोटे यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली.