औरंगाबाद - हिंदूंना शिव्या देत मंदिरांवरील भगवा उतरण्याची भाषा करणाऱ्या एमआयएम पक्षाला आत्ताच कुठून मंदिराविषयी प्रेम निर्माण झाले, असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच मंदिरं उघडण्याविषयी भूमिका मांडली होती. त्यावर आमदार अंबादास दानवे यांनी आक्षेप घेतला आहे. एमआयएमचे हिंदू प्रेम हे बेगडी आहे, असे ते म्हणाले. 'हिंदूंच्या मंदिरांची जबाबदारी हिंदू बघतील, त्यांनी मशिदचे बघावे', असे प्रत्युत्तर दानवे यांनी दिले आहे.
हिंदूंच्या मंदिरांची जबाबदारी हिंदू बघतील - आमदार अंबादास दानवे - emtiyaz jalil
हिंदूंना शिव्या देत मंदिरांवरील भगवा उतरण्याची भाषा करणाऱ्या एमआयएम पक्षाला आत्ताच कुठून मंदिराविषयी प्रेम निर्माण झाले, असा सवाल आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांनी नुकतेच मंदिरं उघडण्याविषयी भूमिका मांडली होती. त्यावर दानवे यांनी आक्षेप घेतला आहे.
संस्थान गणपतीच्या गणेश विसर्जन कार्यक्रमास शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. खासदार इम्तियाज जलील यांनी एक सप्टेंबरला मंदिर उघडण्यास सरकारने परवानगी न दिल्यास जबरदस्ती मंदिरं उघडणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. त्यानुसार मंगळवारी दुपारी एमआयएमतर्फे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिर पुजाऱ्याना मंदिर उघडण्यासाठी साकडं घालणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी जाहीर केले होते.
जलील यांच्या भूमिकेवर शिवसेनेने तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याआधी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी जलील यांची ही नौटंकी असल्याचे म्हटले होते. आता आमदार अंबादास दानवे यांनीही जलील यांच्या भूमिकेला बेगडी म्हटलंय. एमआयएमचे हे बेगडी हिंदू प्रेम असल्याचे ते म्हणाले.
खडकेश्वर हे मंदिर हे शहराचे ग्रामदैवत आहेत. सरकारची परवानगी आल्यानंतर विधीवत पूजा करून मंदिर उघडले जाईल, असे दानवे म्हणाले. काल प्रकाश आंबेडकर यांनी हे आंदोलन केले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासन दिले आहे. लवकरात लवकर या विषयी नियमावली ठरल्यानंतर मंदिर, मशिद, गुरुद्वारा उघडले जातील, असेही आमदार अंबादास दानवे यांनी सांगितले.